खळबळजनक ! ज्यूनिअर नाना पाटेकर याने फेसबुक लाइव्ह करत फिनाइल घेतलं; अभिनेत्याची कशी आहे प्रकृती?

ज्यूनिअर नाना पाटेकर म्हणून ओळख असलेल्या कॉमेडियन तीर्थानंद राव याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर लाइव्ह करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

खळबळजनक ! ज्यूनिअर नाना पाटेकर याने फेसबुक लाइव्ह करत फिनाइल घेतलं; अभिनेत्याची कशी आहे प्रकृती?
junior nana patekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 7:10 AM

मुंबई : द कपिल शर्मा शो फेम ज्यूनिअर नाना पाटेकरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तीर्थानंद राव असं या कॉमेडियनचं नाव आहे. तीर्थानंद रावने फेसबुकवर लाइव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल करत असल्याचा दावा करत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने तीर्थानंद वाचला आहे. यापूर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तीर्थानंद राव याने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माझ्या आजच्या परिस्थितीला एक महिला जबाबदार आहे. माझ्या आयुष्याचं जरकाही बरं वाईट झालं तर मला न्याय मिळाला पाहिजे, असं तीर्थानंद राव याने आत्महत्या करताना फेसबुकवरून म्हटलं होतं. तीर्थानंद राव हा या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता. या महिलेला दोन मुली आहेत. या महिलेने आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल केले आहे. या महिलेने आपल्याकडून पैसे ही घेतल्याचा त्याने दावा केला आहे. ही महिला लग्नाचा तगादा लावत आहे. लग्नासाठी ब्लॅकमेल करत आहे. त्यामुळे मी फिनाइल घेऊन आयुष्य संपवत असल्याचं तीर्थानंद रावने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस घरी पोहोचले

तीर्थानंदच्या या फेसबुक लाइव्हची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांची एक टीम थेट त्याच्या घरी पोहोचली. यावेळी तो बेशुद्ध पडलेला होता. पोलिसांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉक्टर उपचार करत असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस वेळेत पोहोचल्याने त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले.

महिला वेश्याव्यवसाय करते

तीर्थानंदच्या दाव्यानुसार तो ज्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतो, ती महिला वेश्या व्यवसाय करते. त्या महिलेमुळेच आपल्यावर 3-4 लाख रुपयांचं कर्ज असल्याचंही त्याने सांगितलं.

आधीही आत्महत्येचा प्रयत्न

लाइव्ह स्ट्रीम केलेल्या व्हिडीओत तीर्थानंद फिनाइल पिताना दिसत आहे. या पूर्वीही त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी 27 डिसेंबर 2021मध्ये त्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आर्थिक तंगीमुळे त्यावेळी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा त्यावेळी जीव वाचला होता.

27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.