AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द कपिल शर्मा’ शो मधील कलाकाराने लाईव्हवेळी नेमकं का पिलेलं फिनाईल, जाणून घ्या!

बॉलिवूड सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. याचं कारण म्हणजे लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा' शोमधील कलाकाराने लाईव्हवेळी फिनाईल पित संपवण्याचा प्रयत्न केला होता.

'द कपिल शर्मा' शो मधील कलाकाराने लाईव्हवेळी नेमकं का पिलेलं फिनाईल, जाणून घ्या!
ज्विगाटो या चित्रपटानंतर कपिल शर्मा याला एक बिग बजेट चित्रपट मिळाला असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये करीना कपूर खान ही महत्वाच्या भूमिकेत आहे.
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 15, 2023 | 9:22 PM
Share

मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. याचं कारण म्हणजे लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा’ शो फेम तीर्थानंद राव याने आत्महत्येचा प्रयत्न केला. तीर्थानंद राव यानी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. लाईव्ह असताना तीर्थानंद फिनाईल पिताना दिसला. त्यानंतर त्याला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तो सुरक्षित असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

तीर्थानंद राव यानी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. यावेळी त्यानी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचं कारणही सांगितलं.

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तीर्थानंदने सांगितलं, जेव्हा पोलिसांनी माझ्या गर्लफ्रेंड बोलावलं तेव्हा तिनं ‘त्याला मरू देत, मी त्याला सोडून जात आहे’, असं सांगितलं आणि फोन ठेवला. तसंच तिनं माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मी तिला मागे घेण्यास सांगितलं तर तिनं माझ्याकडे मौल्यवान वस्तू आणि पैशांची मागणी केली.

माझ्या गर्लफ्रेंडला माझ्या घरात वाटा हवा आहे. नुकताच मी तिला दोन लाखांचा फोन दिला होता. तसंच मी आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या शरीरात विष पसरले होते. पण सुदैवानं माझ्यावर वेळीच उपचार झाले आणि आता मी पूर्णपणे बरा आहे. मला माझ्या कृतीची लाज वाटतीये पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. गर्लफ्रेंडनं केलेली तिची खोटी केस मागे घ्यावी आणि या सगळ्यातून माझी सुटका करावी अशी माझी इच्छा आहे. कारण मी माझे सर्व पैसे खर्च केले आहेत. तसंच मी माझ्या कामावरही लक्ष केंद्रित करू शकत नाहीये.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत