200 कोटींची कमाई करणाऱ्या The Kashmir Filesच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं?

| Updated on: Mar 24, 2022 | 9:54 AM

'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा आतापर्यंत या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत कमाईचा 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. सिनेमागृहापासून सोशल मीडियापर्यंत या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

200 कोटींची कमाई करणाऱ्या The Kashmir Filesच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं?
The Kashmir Files
Image Credit source: Twitter
Follow us on

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा आतापर्यंत या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत कमाईचा 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. सिनेमागृहापासून सोशल मीडियापर्यंत या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात 1990 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या अत्याचाराची कथा दाखविण्यात आली आहे. लाखो काश्मिरी पंडितांना त्यावेळी आपलं घर सोडावं लागलं होतं. या चित्रपटाचा बजेट कमी असताना, सुरुवातीला मर्यादित स्क्रिनिंग असतानाही माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर दुसऱ्या दिवसापासून त्याने कमाईचा जोर पकडला. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार यांच्यासह इतरही कलाकारांच्या यामध्ये भूमिका आहेत. या कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. (The Kashmir Files Cast Fees)

अनुपम खेर यांनी चित्रपटात पुष्कर नाथ पंडित ही व्यक्तीरेखा साकारली असून त्यांनी या चित्रपटासाठी एक कोटी रुपयांचं मानधन घेतलंय. IAS ब्रह्म दत्त यांची भूमिका साकारणाऱ्या मिथुन चक्रवर्तींचं मानधन दीड लाख रुपये आहे. प्रोफेसर राधिका मदनच्या भूमिकेतील पल्लवी जोशीने 50 ते 70 लाख रुपये मानधन घेतल्याचं समजतंय. तर लक्ष्मी दत्त यांची भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णींनी 50 लाख रुपये मानधन घेतलं आहे. चित्रपटात कृष्णा पंडितची भूमिका साकारणाऱ्या दर्शन कुमारने 45 लाख रुपये घेतले आहेत. पुनित इस्सार यांनी चित्रपटातील भूमिकेसाठी 50 लाख रुपयांचं मानधन घेतल्याचं कळतंय. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक कोटी रुपये मानधन घेतलंय. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कलाकारांचं मानधन-

अनुपम खेर- 1 कोटी रुपये

मिथुन चक्रवर्ती- 1.5 कोटी रुपये

पल्लवी जोशी- 50 ते 70 लाख रुपये

मृणाल कुलकर्णी- 50 लाख रुपये

दर्शन कुमार- 45 लाख रुपये

पुनित इस्सार- 50 लाख रुपये

विवेक अग्निहोत्री- 1 कोटी रुपये

The Kashmir Filesची कमाई काश्मिरी पंडितांना देण्याचा सल्ला देणाऱ्यांना विवेक अग्निहोत्रींचं उत्तर

कमी बजेट आणि मोजकं प्रमोशन करूनसुद्धा चित्रपटाने चांगली कमाई केली, याचं काहीजण कौतुक करत आहेत. IAS अधिकारी नियाज खान (Niyaz Khan) यांनी ट्विट करत कमाईचे हे पैसे निर्मात्यांनी काश्मिरी पंडितांना दान करावं, असा सल्ला दिला. यावर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत उत्तर दिलं. ‘सर नियाज खान साहब, मी 25 तारखेला भोपाळला येतोय. कृपया भेटीसाठी तुमची वेळ द्या, जेणेकरून आपण भेटू आणि विचारांची देवाणघेवाण करू शकू. आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो, तुम्ही तुमच्या पुस्तकांची रॉयल्टी आणि आयएएस अधिकारी म्हणून तुमच्या पॉवरद्वारे कशी मदत करू शकता याबद्दल आपण चर्चा करू,’ असं त्यांनी लिहिलं. याआधीही एका पत्रकाराने चित्रपटाच्या कमाईवरून अग्निहोत्रींना सवाल केला होता. चित्रपटाने कमावलेले पैसे हे काश्मिरी पंडितांना देणार का, असं ट्विट संबंधित पत्रकाराने केलं होतं.

हेही वाचा:

‘जय संतोषी माँ’बाबत जे घडलं तेच 47 वर्षांनंतर The Kashmir Files बाबत घडतंय; पुन्हा घडणार इतिहास?

Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!