चित्रपट रिलीज होण्याच्या पूर्वीच ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी दिले प्रभासला मोठे गिफ्ट

ओम राऊत यांचा आदिपुरुष हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

चित्रपट रिलीज होण्याच्या पूर्वीच आदिपुरुषच्या निर्मात्यांनी दिले प्रभासला मोठे गिफ्ट
| Updated on: Oct 23, 2022 | 12:37 PM

मुंबई : साऊथचा सुपरस्टार अर्थात प्रभास (Prabhas) गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ओम राऊत यांचा आदिपुरुष हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. लोकांना सैफ अली खानचा लूक अजिबातच पचनी पडला नाहीये. नुकताच आदिपुरुषच्या (Adipurush) निर्मात्यांनी प्रभासला वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट देत चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केलंय. या पोस्टमध्ये प्रभासचा जबरदस्त असा लूक दिसतोय. चाहत्यांना देखील प्रभासचा हा लूक आवडलाय. आज प्रभासचा 42 वा वाढदिवस (Birthday) आहे.

प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा खास पध्दतीने देण्यासाठी निर्मात्यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे पोस्टर शेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल होताना देखील दिसत आहे. चाहते प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये इतर कोणीही दिसत नसून फक्त आणि फक्त प्रभासच दिसतोय.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये प्रभास भगवान राम यांच्या अवतारामध्ये दिसत आहे. यामध्ये प्रभासच्या हातामध्ये धनुष्य बाण दिसतोय. हे पोस्टर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ओम राऊत यांना नुकताच भूषण कुमार यांनी आदिपुरुष चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच अत्यंत महागडे गिफ्ट दिले आहे.

आदिपुरुषमधील प्रभासच्या लूकचे पोस्टर जरी प्रेक्षकांना आवडले असले तरीही हे एक सत्य आहे की, चित्रपट मोठ्या वादात सापडलाय. इतकेच नाही तर हे सर्व प्रकरण थेट पोलिसांपर्यंत गेले असून गुन्हे ही नोंद करण्यात आले आहेत. सैफ अली खानच्या लूकवर लोकांनी संताप व्यक्त केलाय.