राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राच्या नात्यावर शिक्कामोर्तब, या खासदाराने केली पोस्ट शेअर

परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. मुंबईमध्ये परिणीती चोप्रा ही खासदार राघव चड्ढा याच्यासोबच स्पाॅट झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले. आता यांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरू आहेत.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राच्या नात्यावर शिक्कामोर्तब, या खासदाराने केली पोस्ट शेअर
| Updated on: Mar 28, 2023 | 8:09 PM

मुंबई : आम आदमी पक्षाचा नेता आणि खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासोबत काही फोटो राघव चड्ढा याचे व्हायरल झाले आहेत. मुंबईमध्ये दोघे अनेकदा स्पाॅट झाले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यांचे काही फोटो व्हायरल (Photo viral) झाल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, असे असताना देखील परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांनी आपल्या नात्यावर काहीच भाष्य केले नाहीये. हे दोघे सतत स्पाॅट होताना दिसत आहेत.

राघव चड्ढा याला काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये परिणीती चोप्रा हिच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, यावर हसत हसत बोलणे टाळताना राघव चड्ढा हा दिसला. परिणीती चोप्रा हिने देखील राघव चड्ढा याच्याविषयी बोलणे टाळले आहे. गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे एकमेकांना डेट करत आहेत.

विशेष म्हणजे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा लवकरच पार पडणार असल्याची चर्चा असून तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वीच साखरपुड्याची शाॅपिंग करतानाही परिणीती चोप्रा ही दिसली होती. दिल्ली येथे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा पार पडणार असे सांगितले जातंय.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे चर्चेत असतानाच एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालीये. ही पोस्ट पाहून चाहत्यांनाही मोठा आनंद झालाय. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आता आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांनी एक पोस्ट शेअर केलीये.

नुकताच खासदार संजीव अरोरा यांनी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केलीये. संजीव अरोरा याने पोस्टमध्ये म्हटले की, मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे मनापासून अभिनंदन करतो…खूप प्रेम आणि आशीर्वाद… माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा… संजीव अरोरा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.