AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawazuddin Siddiqui | या पाकिस्तानी अभिनेत्याने केला नवाजुद्दीन सिद्दीकी याला सपोर्ट, वाचा प्रकरण काय?

नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच या आरोपांवर मोठा खुलासा नवाजुद्दीन सिद्दीकी याने दिला आहे.

Nawazuddin Siddiqui | या पाकिस्तानी अभिनेत्याने केला नवाजुद्दीन सिद्दीकी याला सपोर्ट, वाचा प्रकरण काय?
| Updated on: Mar 08, 2023 | 3:01 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी ही त्याच्यावर सतत गंभीर आरोप लावत आहे. आलिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यामधील वाद आता चव्हाट्यावर आलाय. आलिया सिद्दीकी सोशल मीडियावर (Social media) व्हिडीओ शेअर करत अनेक खुलासे करत आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर बलात्काराचा देखील आरोप केलाय. हे सर्व प्रकरण इतके जास्त वाढले आहे की, हे थेट कोर्टापर्यंत (Court) जाऊन पोहचले आहे. मात्र, आलिया सतत आरोप करत असताना नवाजुद्दीन सिद्दीकी हा शांत होता.

तीन दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तीन पानाचे पत्र शेअर केले. हे शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकी याने लिहिले की, मी कोणावरही आरोप करत नाहीये…या पत्रामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने काही मोठे खुलासे देखील केले आहेत. काही वर्षांपूर्वीच आलिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्याचे देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याने म्हटले आहे.

सोशल मीडियावर आलिया सिद्दीकी हिने एक व्हिडीओ शेअर करून सांगितले होते की, मला आणि माझ्या मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढण्यात आले आहे. माझ्याकडे फक्त 81 रूपये असून माझ्या मुलांसोबत मी कुठे जाऊ हे मला कळत नाहीये. या व्हिडीओमध्ये आलिया ही नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या बंगल्याबाहेर उभी दिसत होती. यावर देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याने स्पष्टीकरण दिले.

हे सर्व प्रकरण सुरू असताना आता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या समर्थनार्थ एक पाकिस्तानी अभिनेता पुढे आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या सपोर्टसाठी या अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केलीये. पाकिस्तानी अभिनेता फिरोज खान याने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या समर्थनार्थ एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

नवाजुद्दीन सिद्दीकी याची पोस्ट रिशेअर करत फिरोज खान याने नवाजुद्दीन सिद्दीकी याला शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याचे समर्थन केले होते. कंगना राणावत हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याची पोस्ट शेअर करत लिहिले होते की, मौन आपल्याला कधीही शांती देत ​​नाही नवाजुद्दीन साहब… तुमचे अनेक चाहते आणि हितचिंतक आहेत जे तुमची बाजू जाणून घेण्यास इच्छूक आहेत. त्यानंतर अनेकांनी यावर कमेंट केल्या होत्या.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.