
मुंबई : वरुण धवन आणि सारा अली खान यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. यांनी कुली नंबर 1 या चित्रपटामध्ये सोबत काम देखील केले. हा चित्रपट जरी बाॅक्स आॅफिसवर हीट ठरला नाही. परंतू या चित्रपटानंतर यांची मैत्री हीट ठरली. काही वर्षांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, सारा वरुण धवनला डेट करत आहे. मात्र, वरुण धवनच्या लग्नानंतर हे स्पष्ट झाले की, हे दोघे फक्त मित्र आहेत. मात्र, नुकताच या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला असून हा फोटो पाहून अनेक चर्चांना परत एकदा उधाण आले आहे.
सारा आणि वरुण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात आहेत. रविवारी दोघांनी इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे.
सारा आणि वरुणचा हा फोटो पाहून अनेकांनी कमेंट करत प्रश्न विचारले आहेत. सारा आणि वरुणने शेअर केलेल्या फोटोमध्ये हे दोघे समुद्र किनारी गेल्याचे दिसत आहे.
साराने सेल्फी घेतला असून दोघेही मस्त अंदाजात दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये वरुणने फोटो घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सारा आणि वरुण दोघांनीही आपआपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अभिनेत्री सारा अली खान हिने लाल रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे तर वरुण शर्टलेस आहे. दोघेही बीचवर पोज देताना दिसत आहेत.
वरुण आणि सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. वरुण आणि साराच्या चाहत्यांना हे फोटो आवडले आहेत.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मध्ये सारा अली खान आणि वरुण धवन यांचा एक खास डान्स होणार आहे. या चित्रपट महोत्सवात अनेक कलाकारही सहभागी होणार आहेत.