दोस्तांसाठी कायपण! वरुण धवनच्या पार्टीला मलायकापासून कियाराची हजेरी!

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) लग्नानंतर इंडस्ट्रीच्या काही जवळच्या मित्रांसाठी त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते.

दोस्तांसाठी कायपण! वरुण धवनच्या पार्टीला मलायकापासून कियाराची हजेरी!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) लग्नानंतर इंडस्ट्रीच्या काही जवळच्या मित्रांसाठी घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मलायका अरोरा, अर्जुन कपूर, सारा अली खान, कियारा अडवाणी, दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ सारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीला अर्जुनबरोबर मलायका आली होती तर दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफही जोडीने आले होते. (Varun Dhawan organized a wonderful party for his friends)

sara ali khan

वरुण धवन 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकला आहे. वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलाल (Natasha Dalal) सोबत लगीनगाठ बांधली आहे. या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या साक्षीने सप्तपदी घेतली. अलिबागमध्ये अगदी मोजक्या कुटुंबाच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. यात लग्नसोहळ्यात फक्त 50 जण सहभागी झाले होते. वरुणने स्वतः लग्नाचे फोटो शेअर केले होते.

sara ali khan 1

एवढेच नाही तर त्यांनी हळद आणि मेहंदीचे फोटोही शेअर होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे.

संबंधित बातम्या : 

रणबीर कपूरची ‘रेंज रोवर’ मुंबई पोलिसांकडून ताब्यात, काय आहे प्रकरण?

कंगना रनौतचा आता अरविंद केजरीवालांवर निशाणा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल !

Video | सोनू सूदने गावकऱ्यांची इच्छा केली पूर्ण म्हणाला, आता बोला!

(Varun Dhawan organized a wonderful party for his friends)

Published On - 9:41 am, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI