AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेच्या विद्या बालनला भीक मागावी लागली?; कॉफी शॉप अन् रेल्वे स्थानकात असं काय घडलं?

आपल्या कामांमुळे अभिनेत्री विद्या बालन नेहमीच चर्चेत असते. मात्र, तिच्या अतरंगी आणि बिनधास्त स्वभावामुळेही ती नेहमी चर्चेत असते. विद्या कधी काय करेल याचा नेम नसतो. कुणी तिला चॅलेंज दिलं तर ती पटकन स्वीकारते. चॅलेंज स्वीकारणं हा तिच्या हातचा मळ आहे. मात्र, तिच्या या सवयीमुळे चॅलेंज देणारे तिचे मित्र मात्र कधी कधी खजिल होऊन जातात. कारण चॅलेंजच तसं असतं.

अरेच्या विद्या बालनला भीक मागावी लागली?; कॉफी शॉप अन् रेल्वे स्थानकात असं काय घडलं?
Vidya Balan Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2024 | 9:21 PM
Share

बॉलिवूडची सर्वात हॉट आणि प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन नेहमीच तिच्या अभियनामुळे चर्चेत असते. एक कसदार अभिनेत्री म्हणून तिच्या अभिनयाचं नेहमी कौतुक होतं. मेहनत आणि टॅलेंटच्या बळावर तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. मात्र, त्यासाठी विद्याला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. वैयक्तिक आयुष्यात तिला प्रत्येक पावलागणिक संघर्षाला तोंड द्यावं लागलं आहे. एकदा तर तिला भीक सुद्धा मागावी लागली आहे. स्वत: विद्यानेच हा किस्सा सांगितला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आपल्या खासगी आयुष्यामुळे विद्या बालन नेहमी चर्चेत असते. प्रत्येक मुद्द्यावर विद्या बिनधास्तपणे बोलते. आपलं मत व्यक्त करते. तिचा दो और दो प्यार हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. येत्या 19 एप्रिल रोजी तिचा हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. विद्याचा सिनेमा म्हटल्यावर तिच्या चाहत्यांना तिच्या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. मात्र, हा सिनेमा रिलीज होण्याच्या पूर्वी विद्याने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग शेअर केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिला एका कॉफी शॉपच्या बाहेर भीक मागावी लागली होती, असं तिने सांगितलंय.

भूक लागलीय, खायला द्या

विद्या अत्यंत बिनधास्त आहे. तिला आव्हान स्वीकारणं आवडतं. एकदा तिला कुणी तरी चॅलेंज केलं. तिनेही ते चॅलेंज स्वीकारलं. चॅलेंज काय तर भीक मागण्याचं. पण अभिनेत्रीने आनंदाने हे चॅलेंज स्वीकारलं. हा किस्सा स्वत: विद्यानेच सांगितला होता. ती एका इंडियन म्युझिकल ग्रुपचा भाग होती. परफॉर्मन्ससाठी तिला ग्रुपसोबत बाहेर जावं लागायचं. त्यावेळी ग्रुपमधील एका व्यक्तीने तिला चॅलेंज केलं. कॉफी शॉपच्या समोर जायचं, मला खूप भूक लागलीय, खायला काही तरी द्या, असं लोकांना म्हणायचं, असं चॅलेंज विद्याला देण्यात आलं. विद्याने हे चॅलेंज स्वीकारलं आणि करूनही दाखवलं. ती कॉफी शॉपच्या बाहेर उभी राहिली. दरवाजा ठोठावत येणाऱ्या जाणाऱ्यांकडे भीक मागत होती. काही तरी खायला द्या म्हणून विनवत होती.

लोकांना थांगपत्ताही नव्हता

मी कॉफी शॉपच्या बाहेर उभी होते. काही तरी खायला द्या प्लीज म्हणून लोकांना विनवणी करत होते. कालपासून काहीच खालेल्लं नाहीये. भूक लागलीय. विशेष म्हणजे मी हे करत असताना मी अभिनेत्री आहे याचा लोकांना थांगपत्ताही नव्हता, असं ती म्हणाली.

स्टेशनवर भीक मागितली

दरम्यान, विद्याने हे आव्हान स्वीकारल्यानंतर तिच्या मित्रांना त्यांचीच लाज वाटू लागली. अन् शॉपमध्ये येणारे लोक वैतागले होते. विशेष म्हणजे एका बिस्किटासाठी विद्याने हे चॅलेंज स्वीकारलं होतं. एकदा तर ती भिकाऱ्यांचा ड्रेस घालून हैदराबादच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन बसली होती. त्यावेळी तिचा हा फोटो व्हायरलही झाला होता.

साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.