Viral Video: माधुरीचं ‘हे’ टॅलेंट पाहून वहिदा रहमान यांना बसला आश्चर्याचा धक्का! म्हणाल्या “ओह माय गॉड, तू हे कसं करतेस?”

या व्हिडिओमध्ये माधुरीचं टॅलेंट पाहून वहिदा यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. दोघांच्या या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Viral Video: माधुरीचं 'हे' टॅलेंट पाहून वहिदा रहमान यांना बसला आश्चर्याचा धक्का! म्हणाल्या ओह माय गॉड, तू हे कसं करतेस?
Viral Video: माधुरीचं 'हे' टॅलेंट पाहून वहिदा रहमान यांना बसला आश्चर्याचा धक्का!
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 08, 2022 | 10:26 AM

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माधुरीचं टॅलेंट पाहून वहिदा यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. दोघांच्या या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांनी डान्स दिवाने या रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी माधुरी दीक्षित या शोची परीक्षक होती. वहिदाही या शोमध्ये पाहुण्या जजच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या व्हायरल व्हिडीओमध्ये वहिदा रहमान माधुरीला डान्स दिवानेच्या (Dance Deewane) सेटवर विचारतात, “तू पण तोंडाने शिट्टी वाजवतेस का?” तेव्हा माधुरी म्हणते, “हो, मी स्वत: शिट्टी वाजवू शकते.” हे ऐकून वहिदा यांना धक्काच बसतो आणि त्या म्हणतात ‘ओह माय गॉड’!

वहिदा रहमान या वेळी त्यांची मुलं आणि चुलत भावंडं त्यांना शिट्टी वाजवायला कसे शिकवायचे ते सांगतात. पण त्या हे कधीच शिकू शकल्या नाहीत असं म्हणतात. यानंतर माधुरी म्हणते, “मी माझ्या बिल्डिंगच्या मुलांना शिट्टी कशी वाजवतात ते शिकवायचे.” हे ऐकून सगळेच हसायला लागतात. गेल्या वर्षी 23 मार्च 2021 रोजी माधुरी दीक्षितने वहिदा रहमान यांच्यासोबतचा एक खास व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती वहिदा यांच्या ‘पान खाये सैयां हमारा’ या गाण्यावर डान्स करताना दिसली.

पहा व्हिडीओ-

वहिदा रहमान यांची कारकीर्द

वहिदा रहमान यांनी 1955 मध्ये रोझुलु मारवाई आणि जयसिम्हा या तेलुगू चित्रपटांमधून पदार्पण केलं. यानंतर त्यांनी बंगाली, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी सीआयडी, गाईड, प्यासा, कागज के फूल, रेश्मा आणि शेरा यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या स्केटर गर्ल या चित्रपटामध्ये त्या झळकल्या होत्या.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें