सेलिब्रिटींच्या नावांचा वापर करून बॉम्बची धमकी, मुंबई पोलिसांना त्रास देणारा ‘तो’ कोण?

सेलिब्रिटींच्या नावांचा वापर करून बॉम्बची धमकी... आतापर्यंत नऊ धमकीच्या ईमेल्स समोर..., मुंबई पोलिसांना त्रास देणारा 'तो' कोण? बॉम्बची धमकी दिल्यामुळे सर्वत्र खळबळ

सेलिब्रिटींच्या नावांचा वापर करून बॉम्बची धमकी, मुंबई पोलिसांना त्रास देणारा तो कोण?
| Updated on: Jul 16, 2025 | 11:25 AM

दक्षिणेकडील राज्यांमधील राजकारणी, अभिनेते आणि लोकप्रिय युट्यूबर्सच्या नावांचा वापर करून अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या बनावट बॉम्ब धमकीच्या ईमेलची मुंबई पोलिस चौकशी करत आहेत. पोलिसांना आतापर्यंत असे 9 ईमेल धमक्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, हे ईमेल एकाच व्यक्तीने पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे. असा दावा केला आहे की मुंबई आणि आसपासच्या लोकप्रिय ठिकाणी आणि सरकारी आस्थापनांवर RDX-आधारित सुधारित स्फोटक उपकरणे (IEDs) ठेवण्यात आली आहेत.

बीएसईला आलेल्या धमकीच्या मेलमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. आरोपी व्हीपीएन वापरत असल्याने त्याला शोधणं पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. दक्षिण भारतातील नेते, अभिनेते आणि यूट्यूबर्स यांची नावे वापरून आरडीएक्ससंबंधी बनावट बॉम्बस्फोटाच्या धमक्या देणाऱ्या ईमेल्सचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

अशा प्रकारच्या सुमारे नऊ धमकीच्या ईमेल्स आत्तापर्यंत प्राप्त झाल्या असून, हे सर्व एकाच व्यक्तीने पाठवले असावेत, असा संशय आहे. या आरोपीने आतापर्यंत उदयनिधी स्टालिन, यूट्यूबर सुबक्कू शंकर, IPS अधिकारी जाफर सैत या नावांचा वापर करून धमकीचे मेल पाठवल्याच समोर आलेल आहे.

मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, आरोपीने यापूर्वी धमकी आणि कट रचण्यासाठी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेता उदयनिधी स्टॅलिन, युट्यूबर सुबक्कू शंकर, आयपीएस अधिकारी जफर सैत आणि अफजल गुरु यांची नावे वापरली होती.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती ज्या पद्धतीने दक्षिण भारतीय सेलिब्रिटींचा वापर करतो आणि कट रचण्याच्या सिद्धांतांचा उल्लेख करतो त्यावरून असा संशय येतो की आरोपी हा दक्षिणेकडील राज्यातील आहे किंवा तो दिशाभूल करण्यासाठी असं करत आहे. आम्ही अजूनही तांत्रिक तपास करत आहोत आणि दोषींचा शोध लवकरच घेऊ… असं देखील सांगण्यात आलं आहे.

सांगायचं झालं तर, सेलिब्रिटींनी ईमेलद्वारे धमकावण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी देखील अनेकांनी धमकी देण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान याला देखील अनेकदा जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. नुकताच विनोदवीर कपिल शर्मा याच्या कॅनडा येथील कॅफेवर गोळीबार  करण्यात आला. एवढंच नाही तर, कॅनडात येऊन उद्योक करु नकोस.. अशी धमकी देखील कपिल याला देण्यात आली.