AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूर आणि वडिलांवर का आली इतके अपार्टमेंट्स विकण्याची वेळ? कोट्यवधींमध्ये होती किंमत!

boney kapoor and daughter : असं काय झालं की त्यांच्यावर एक दोन नाहीतर तब्बल चार घरे विकण्याची आली वेळ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बोनी कपूर आणि जान्हवी कपूर यांची चर्चा...

जान्हवी कपूर आणि वडिलांवर का आली इतके अपार्टमेंट्स विकण्याची वेळ? कोट्यवधींमध्ये होती किंमत!
| Updated on: Dec 23, 2023 | 3:53 PM
Share

मुंबई | 23 डिसेंबर 2023 : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्या दोन मुलींचा सांभाळ करत आहे. श्रीदेवी यांच्या निधनांतर अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची लहान बहीण खूशी कपूर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. जान्हवी आणि खुशी यांना देखील आई प्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करायचं आहे. याच दरम्यान, श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली आणि वडील तुफान चर्चेत आले आहेत. यामागे कारण देखील तसंच आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी मुंबईतील चार अपार्टमेंट्स विकेले आहेत. चारही अपार्टमेंट्स अंधेरी येथील ग्रीन एकर्स परिसरातील आहेत. सध्या सर्वत्र बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींची चर्चा होत आहे.

रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे. बोनी यांनी त्यांचे अंधेरीतील 4 फ्लॅट्स आणि तेही मोठ्या रकमेत विकल्याची माहिती समोर येत आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी त्यांचे ४ अपार्टमेंट विकल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. हे चार फ्लॅट मुंबईतील अंधेरी येथील ग्रीन एकर्स परिसरात आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रिपोर्टमध्ये फ्लॅटची किंमतही नमूद करण्यात आली आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी सर्व फ्लॅट 12 कोटींहून अधिक रुपयांना विकल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात मोठा फ्लॅट 1870 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला होता. हा मोठा फ्लॅट अंजू नारायण आणि सिद्धार्थ नारायण यांना विकण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहेय.

जान्हवी कपूर हिचे आगामी सिनेमे

जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन स्टारर ‘बवाल’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करु शकला नाही. पण अभिनेत्रीच्या अभिनयाचं कौतुक सर्वत्र करण्यात आलं. जान्हवी लवकरच ‘मिस्टर एन्ड मिसेज माही’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगत आहे.

जान्हावी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील जान्हवी कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?