275 कोटी बजेटच्या ‘या’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ‘धुरंधर’, ‘छावा’ला दिली मात

तब्बल 275 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'ला मात दिली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

275 कोटी बजेटच्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात धुरंधर, छावाला दिली मात
movie scene
Image Credit source: Youtube
| Updated on: Jan 30, 2026 | 11:14 AM

सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आणि वीकेंडनिमित्त या चित्रपटाचे बहुतांश शोज हाऊसफुल होते. देशभक्तीपर कथा असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच गर्दी केली होती. परंतु सुट्टीनंतर पुन्हा कामाचे दिवस सुरू झाल्याने कमाईवर थोडा परिणामही झाला. असं असलं तरी ‘बॉर्डर 2’ने आतापर्यंत दमदार कमाई केली आहे. 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नुकताच बॉक्स ऑफिसवर आठवडा पूर्ण केला आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 2025 मधील दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांना मात दिली आहे.

‘बॉर्डर 2’ची पहिल्या आठवड्यातील कमाई किती?

  • अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाने थिएटरमध्ये यशस्वीरित्या एक आठवडा पूर्ण केला आहे. या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे.
  • ‘बॉर्डर 2’ने पहिल्याच दिवशी 6078 शोज आणि 37.0% सरासरी ऑक्युपन्सीसह 30 कोटी रुपयांची कमाई केली होती.
  • दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 43.1% सरासरी ऑक्युपन्सी आणि 6297 शोजसह 36.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
  • तिसऱ्या दिवशी 6434 शोज आणि 62.5% सरासरी ऑक्सुपन्सीसह 54.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
  • चौथ्या दिवशी, प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीदिनी या चित्रपटाने 6465 शोज आणि 65.2% सरासरी ऑक्युपन्सीसह 59 कोटी रुपयांची कमाई केली.
  • पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आणि 6797 शोजमध्ये फक्त 25.5% सरासरी ऑक्युपन्सी पहायला मिळाली. यासह चित्रपटाने 20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
  • सहाव्या दिवशी या चित्रपटाने 6422 शोजसह 13 कोटी रुपयांची कमाई केली होती. यावेळी 17.7% सरासरी ऑक्युपन्सी होती.
  • ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, सातव्या दिवशी या चित्रपटाने भारतात 11.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
  • यासह ‘बॉर्डर 2’ची पहिल्या आठवड्यातील भारतातील कमाईचा आकडा 224.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

‘बॉर्डर 2’ने ‘धुरंधर’ आणि ‘छावा’ला दिली मात

‘बॉर्डर 2’ने पहिल्याच आठवड्यात 2025 मधल्या दोन मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या पहिल्या आठवड्यातील कमाईला मागे टाकलं आहे. रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पहिल्या आठवड्यात 207 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर विकी कौशलच्या ‘छावा’ने 219 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे ‘बॉर्डर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या पुढे गेला आहे.

पहिल्या आठवड्यातील कमाई

  1. बॉर्डर 2- 224.25 कोटी रुपये
  2. छावा- 219 कोटी रुपये
  3. धुरंधर- 207 कोटी रुपये
  4. टायगर जिंदा है- 216.04 कोटी रुपये
  5. संजू- 202.51 कोटी रुपये
  6. दंगल- 197.54 कोटी रुपये
  7. धूम 3- 188.99 कोटी रुपये
  8. बजरंगी भाईजान- 184.62 कोटी रुपये
  9. पीके- 183.09 कोटी रुपये
  10. टायगर 3- 183 कोटी रुपये
  11. भारत- 180.5 कोटी रुपये