सलमान खान गोळीबार प्रकरणी स्फोटक माहिती समोर, आरोपींचं महिन्याभरापासून पनवेल हरिग्राम गावात वास्तव्य

| Updated on: Apr 15, 2024 | 10:37 PM

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या घरावर झालेला गोळीबार पूर्व नियोजित कट होता. गोळीबाराच्या 15 दिवसांपासून आरोपी पनवेलमधील एका घरात भाड्यावर राहत होते. आरोपींनी चार वेळा सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेक्की केली होती.

सलमान खान गोळीबार प्रकरणी स्फोटक माहिती समोर, आरोपींचं महिन्याभरापासून पनवेल हरिग्राम गावात वास्तव्य
सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाची ओळख पाटली आहे
Follow us on

अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी हे महिनाभर पनवेलमधील हरिग्राम गावात राहत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपींनी राहण्यासाठी नव्याने बांधलेली इमारत निवडली होती. त्यांनी हरिग्रामच्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट रचला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पनवेलच्या हरिग्राम गावात दोन्ही आरोपी हे महिनाभर राहिले. आरोपींबद्दल इमारतीमधील रहिवाशांना फारशी माहिती नाही. तर आरोपींना घर भाड्याने देणारा पोलिसांच्या ताब्यात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या घरावर झालेला गोळीबार पूर्व नियोजित कट होता. गोळीबाराच्या 15 दिवसांपासून आरोपी पनवेलमधील एका घरात भाड्यावर राहत होते. आरोपींनी चार वेळा सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेक्की केली होती. आरोपींनी पनवेलमध्ये घर भाड्याने घेतल्याने सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर सलमान असतानाच हल्ला करण्याचा कट असल्याचा पोलिसांना संशय आहे.

गोळीबाराचा आणखी एक सीसीटीव्ही समोर

सलमान खानच्या घरावर गोळीबाराचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलं आहे. सलमानच्या घरावर सकाळी ४.५५ मिनिटांनी गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर चार राऊंड फायर करून पसार झाले. एक गोळी गॅलरीमधून घरात शिरली तर एक इमारतीच्या भिंतीवर आदळली. घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस देखील जप्त करण्यात आलं होतं.

सलमानच्या सुरक्षेत वाढ

सलमान खानच्या सुरक्षेसाठी संख्याबळ वाढवण्यात आलं आहे. सलमानला सध्या वाय प्लस हिच सुरक्षा आहे. मात्र संख्याबळ वाढवण्यात आलंय. स्थानिक पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. काही पोलीस वाढवण्यात आलेले आहेत. सलमान खान शुटींगच्या निमित्ताने बाहेरगावी जात असल्यास योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून योग्य त्या खबरदारीची पाऊले उचलली जात आहेत.

पोलीस आयुक्त कार्यालयात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक

पोलीस आयुक्त कार्यालयात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतरची ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व युनिटचे सीनियर पीआय आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कालच हा तपास लोकल पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. गुन्हे शाखेची वेगवेगळी पथक सध्या तपास करत आहेत.

मुंबईतून खंडणी वसूल करण्याचा बिश्नोई गँगचा प्लॅन?

सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी या प्रकरणी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशत निर्माण करायची आहे. दाऊद नंतर मुंबईवर राज्य करण्यासाठी गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सलमान खान व्हीआयपी असल्यानेच त्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. मुंबईत सध्या दाऊदचं काहीच राहिलं नाही. त्यामुळे बिश्नोई गँगला नव्याने जम बसवायचा होता यासाठीच हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार करून दाऊद गँगला आव्हान देण्याचं बिश्नोई गँगचा प्लॅन आहे. दाऊदला आव्हान देवून मुंबईतून खंडणी वसूल करण्याचा बिश्नोई गँगचा प्लॅन असल्याचा दावा बडा अधिकाऱ्याने केला आहे.