AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याच्या ‘टायगर 3’ला मिळाले प्रेक्षकांकडून ‘हे’ रिव्ह्यू, थेट म्हटले, बाप रे बाप…

सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट मोठ्या प्रतिक्षेनंतर रिलीज झालाय. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आज दिवाळीच्या दिवशीच सलमान खान याचा चित्रपट धमाका करताना दिसतोय.

सलमान खान याच्या 'टायगर 3'ला मिळाले प्रेक्षकांकडून 'हे' रिव्ह्यू, थेट म्हटले, बाप रे बाप...
| Updated on: Nov 12, 2023 | 1:26 PM
Share

मुंबई : दिवाळीच्या दिवशी सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. सलमान खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही नक्कीच आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ या चित्रपटात धमाका करत आहेत. आता टायगर 3 चित्रपटाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया या सोशल मीडियाला येताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाचे काैतुक केल्याचे बघायला मिळतंय. चित्रपट नक्कीच जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय.

एकंदरीतच काय तर सलमान खान याच्या चित्रपटाला चांगला रिव्ह्यू मिळताना दिसतोय. एकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, टायगर 3 मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा भूमिका जबरदस्त आहेत, विशेष म्हणजे त्यांनी धमाकेदार असे अॅक्शन देखील केले. #Tiger3Review- माझी 5/5….असे त्या व्यक्तीने लिहिले.

दुसऱ्याने पोस्ट शेअर करत लिहिले की, चित्रपटामध्ये अॅक्शनसोबतच मला चित्रपटाची स्टोरी देखील आवडलीये. सर्वच कलाकार उत्तर प्रकारे आपल्या भूमिका या साकारत आहेत. चित्रपट पाहताना कधी टाळ्या वाजवू आणि शिट्या हेच मुळात कळत नाहीये. नक्कीच सलमान खान याचा हा चित्रपट ओपनिंगलाच करोडोंचा बिझनेस करेल.

तिसऱ्याने लिहिले की, धन्यवाद मनीष शर्मा सलमान खान याला या रूपामध्ये बघू देण्यासाठी. सर्वजग त्याला अशाप्रकारे पाहण्यास इच्छुक होते. इमरान हाश्मी बाप रे बाप, त्याने निगेटिव्ह भूमिका साकारली आहे, खरोखरच खूपच जास्त जबरदस्त. अजून एकाने लिहिले की, खरोखरच टायगर 3 मधील स्वॅग जबरदस्त आहे.

सलमान खान आणि चित्रपटाच्या टिमकडून आम्हाला दिवाळीचे खरोखरच खूप मोठे गिफ्ट  मिळाले आहेत. एकीकडे चित्रपटाचे काैतुक केले जात आहे तर दुसरीकडे चित्रपटाला नकारात्मक रिव्ह्यू देखील मिळताना दिसत आहे. एकाने लिहिले की, मला सलमान खान हा या चित्रपटामध्ये खूपच जास्त सुस्त दिसत आहे.

अजून एकाने नकारात्मक रिव्ह्यू देत लिहिले की, मला हा चित्रपट अजिबातच आवडला नाहीये. खूप झाले तर हा चित्रपट 250 कोटींपर्यंत कमाई करू शकतो. अनेकांनी कतरिना कैफ हिची भूमिका आवडली नसल्याचे देखील दिसत आहेत. आता सर्वांच्या नजरा या चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनकडे लागल्याचे स्पष्ट दिसतंय.

Follow Us
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!