AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxmikant Berde : लक्ष्याने स्वतःचे हाल करुन घेतले, तो जायच्या आधी…चेतन दळवी यांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची भावुक आठवण

Chetan Dalvi On Laxmikant Berde : ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली आहे.

Laxmikant Berde : लक्ष्याने स्वतःचे हाल करुन घेतले, तो जायच्या आधी...चेतन दळवी यांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची भावुक आठवण
| Updated on: Oct 29, 2026 | 5:01 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आपल्या सहजसुंदर अभिनयशैलीनं आणि अफलातून विनोदबुद्धीनं त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आजही त्यांचे चित्रपट पाहताना प्रेक्षक मनमुराद हसतात. त्यांच्या अभिनयाची जादू आणि साधा, मनमिळाऊ स्वभाव यामुळे ते अनेकांच्या कायम स्मरणात आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांच्या मनात त्यांच्या असंख्य आठवणी आजही ताज्या आहेत. त्यांच्या अभिनयातील सहजता, विनोदाचं अचूक टायमिंग आणि सहकलाकारांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं याविषयी अनेकदा किस्से ऐकायला मिळतात. एका जुन्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली आहे.

चेतन दळवी यांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण

ज्येष्ठ मराठी अभिनेते चेतन दळवी यांनीही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी संबंधित एका भावनिक प्रसंगाला उजाळा दिला आहे. चेतन दळवी आणि लक्ष्मीकांत यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. चेतन दळवी म्हणाले की, ‘लक्ष्याबरोबर कोणतीही भूमिका असो, मी करायला तयार आहे. लक्ष्या जायच्या आधी मी त्याला भेटायला गेलो. ‘काय रे, कसा आहेस?’ अशी मी लक्ष्याची विचारपूस केली. लक्ष्या मला म्हणाला, ‘तुम्ही दोघंच माझे.’ त्यावेळी त्यानं माझं आणि विजय चव्हाणचं नाव घेतलं. ‘तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही माझं.’ असं लक्ष्या मला म्हणाला.’

‘मी लक्ष्याला म्हटलं, ‘वेडा आहेस तू. आधी सांगायचं ना आम्हाला, काय होतंय ते! त्याने स्वतःचे फार हाल करुन घेतले होते.’ असं चेतन पुढे सांगितलं. ‘फिल्मी मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत चेतन दळवी बोलत होते.

दरम्यान, चेतन दळवी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘टूरटूर‘ नाटकात एकत्र काम केलं आहे. या नाटकातील त्यांची भूमिका खूप गाजली. तसेच त्यांनी ‘फेका फेकी‘, ‘हमाल दे धमाल‘ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय. आजही चाहते लक्ष्मीकांत आणि चेतन यांचे सिनेमे आवर्जून बघतात.

Follow Us
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक