AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा पराभव, भाजपचे शिवसेनेवर आरोप, एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर आता भाजपकडून शिवसेना शिंदे गटावर आरोप करण्यात येत आहेत. त्याला आता शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा पराभव, भाजपचे शिवसेनेवर आरोप, एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला
eknath shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 4:59 PM
Share

राज्यात पाच जागांवर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. दरम्यान या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. पाच पैकी दोन जागांवरच महायुतीला विजय मिळवता आला, तर तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. दरम्यान यावरून आता भाजपने शिवसेना शिंदे गटावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने मदत केली असती तर आणखी चांगला निकाल लागला असता, असं भाजपकडून म्हटलं जातं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना नेहमीच युतीधर्म पाळत आलेली आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

शिवसेना नेहमीच युतीधर्म पाळत आलेली आहे,  या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चार ठिकाणी युती होती.  पुणे मतदारसंघामध्ये शिवसेना पुरस्कृत आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, अशी मात्रीपूर्ण लढत देखील होती. शिवसेनेने नेहमी युतीधर्म पाळलेला आहे आणि युतीधर्म पाळावा, अशी भूमिका शिवसेनेची राहिलेली आहे, असं यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दुष्काळावर प्रतिक्रिया 

दरम्यान यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दुष्काळावर आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  शेतकऱ्यांच्या मुलींबाळींच्या लग्नाची जबाबदारी असो, वा शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सरकार देखील पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली, साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद देखील केली. शेतकऱ्यांना खात्रीची मदत मिळेल. विरोधक म्हणतात पाच हजार रुपयांनी काय होणार? ही मदत नाहीये, ही तातडीची मदत आहे. दुष्काळामध्ये जे जे काही लाभ आहेत, ज्या सवलती आहेत, शाळेची फी आणि इतर सवलती देखील मिळणार आहेत.  शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. शिवसेना देखील पूर्ण ताकदीने उभी आहे. धाराशिवमध्ये २४ हजार लोकांच्या घरामध्ये दिवाळीचा शिधा पोहोचेल, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक