‘छावा’ मधील बालकलाकार हुबेहूब दिसतो सलमान खान सारखा, तेच डोळे, तसेच केस…, व्हिडीओ पाहून म्हणाल…

Chhaava Child Actor Dhwaj Gor: 'छावा' सिनेमातील बालकलाकार म्हणजे लहानपणीचा सलमान खान, त्याचे भाईसारखे डोळे, तसेच केस..., व्हिडीओ पाहून म्हणाल..., व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल

छावा मधील बालकलाकार हुबेहूब दिसतो सलमान खान सारखा, तेच डोळे, तसेच केस..., व्हिडीओ पाहून म्हणाल...
| Updated on: Mar 04, 2025 | 2:17 PM

Chhaava Child Actor Dhwaj Gor: अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाने 18 दिवसांमध्ये जगभरात 630 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सध्या सर्वत्र विकी कौशल याने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. तर आता सोशल मीडियावर आणखी एका सिनेमातील कलाकाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल आहे. सध्या ज्या कलाकाराची चर्चा सर्वत्र रंगली आहे, तो सिनेमातील बालकलाकार आहे.

 

 

सध्या त्या बालकलाकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलाला पाहिल्यानंतर तो हुबेहूब अभिनेता सलमान खान सारखा दिसत असल्याचं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सिनेमातील या बालकलाकाराचं नाव ध्वज गौर आहे. इन्स्टाग्रामवर ध्वज याची ओळख अभिनेता आणि मॉडेल अशी आहे . इन्स्टाग्रामवर त्याचे 1404 फॉलोअर्स आहे. त्याने सिनेमातील अनेक सीनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 

 

दरम्यान, सोशल मीडियावर ध्वज याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून एक नेटकरी म्हणाला, ‘हा तर हुबेहूब सलमान खान दिसत आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हा कोण आहे? सर्वत्र चर्चेत आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हा मोठा झाल्यानंतर हुबेहूब सलमान खान सारखा दिसणार.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘त्याचे डोळे तर सलमान खान सारखेच आहेत…’ सध्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

 

 

ध्वज याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे. त्याचं सोशल मीडियाची जबाबदारी आई – वडिलांवर आहे. सोशल मीडियावर देखील ध्वज कायम सक्रिय असतो. ‘छावा’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारल्यामुळे ध्वज याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.