
Chhaava fame Sarang Sathaye: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमात विकी, रश्मिका आणि अभिनेता अक्षय खन्ना यांनी साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होत आहे. पण अभिनेता सारंग साठ्ये आणि सुव्रत जोशी यांनी नकारात्मक भूमिका साकारली आहे. सारंग याने गणोजी आणि सुव्रत याने कान्होजी यांची भूमिका साकारली आहे. आता सारंग याने त्याने साकारलेल्या भूमिकेवर मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता सारंग साठ्ये यांनी सिनेमात साकारलेल्या नकारात्मक भूमिकेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘लोकं मारायला निघालेत. याच कारणामुळे मी प्रेक्षकांच्या प्रतिसादावर फारसं बोलणार आहे. त्यांचं देखील अगदी बरोबर आहे. कारण ती साधी गोष्ट नव्हती. स्वराज्याला तडा जाईल अशी गोष्या त्या भूमिकेने केली. त्यामुळे मी प्रेक्षकांचा रोष स्वीकारण्यासाठी देखील तयार आहे…’
दिग्दर्शकांबद्दल सारंग म्हणाला, ‘लक्ष्मण सरांनी आम्हाला कास्ट केलं, त्यामागचं एकच कारण होतं. त्यांना असे दोन कलाकार हवे होते, ज्यांनी कायम गोड काम केलं आहे. ज्यांनी यापूर्वी कधीही नकारात्मक भूमिका साकारलेली नाही. त्यामुळे पुढे जाऊन काय होणार याची कोणी कल्पनाच केली नव्हती… त्यामुळे ती भूमिका प्रेक्षकांच्या आणखी जिव्हारी लागेल… म्हणून त्यांनी आम्हाला कास्ट केलं. आमच्या मनात धकधक होती. पण चांगलंच होणार असा विश्वास लक्ष्मण सरांना होता… त्यामुळे संपूर्ण श्रेय त्यांचं आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
रिपोर्टनुसार, रिलीजच्या दुसऱ्या मंगळवारी, ‘छावा’ सिनेमाने जगभरात कमाई करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. सिनेमाने सुमारे 22 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे ‘छावा’ सिनेमाचं एकूण जगभरातील कलेक्शन आता 500 कोटींच्या पुढे गेले आहे.