Chinmayi Sripada : तिचा छळ झालेला, मृत्यू झाला म्हणून ते देवदूत…तनुश्री दत्ताला सुप्रसिद्ध गायिकेचा पाठिंबा, नानांबद्दल नको ते बरळली
Chinmayi Sripaada On Tanushree Dutta : तनुश्री दत्ताला नाना पाटेकर यांच्या निधनावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ट्रोल करण्यात आलेलं. आता सुप्रसिद्ध गायिका तनुश्रीच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.

बॉलिवूडच्या सर्वात दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेले नाना पाटेकर यांचं ८ ऑक्टोबर रोजी निधन झालं असून त्यांच्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मात्र, अभिनेत्री तनुश्री दत्तानं त्यांच्या निधनावर आनंद व्यक्त करत ‘वाईटपणा संपला.’ असं म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतरही, अभिनेत्याबद्दल वाईट बोलल्यामुळे तनुश्रीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. यादरम्यान, प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा तनुश्रीच्या समर्थनासाठी पुढे आली आहे.
चिन्मयी श्रीपदा काय म्हणाली?
चिन्मयी श्रीपदानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तनुश्री दत्ताला पाठिंबा दिला. चिन्मयीनं प्रश्न विचारला आहे की, तनुश्रीनं नॉर्मल राहावं अशी अपेक्षा का केली जात आहे? दिवंगत नाना पाटेकर यांच्यावर निशाणा साधत चिन्मयी म्हणाली की, मृत्यू माणसाला देवदूत बनवत नाही.
चिन्मयी श्रीपदानं लिहिलं की, ‘तनुश्री दत्ता २०१८ मध्ये बोलली (त्या आधी, राया सरकार २०१७ मध्ये बोलली होती, पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही). तनुश्रीला एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं आणि तिला तिच्या छळ करणाऱ्याच्या मृत्यूविषयीच्या प्रश्नांना सामोरं जायचं नव्हतं.’
‘२००८ मध्ये चित्रपटाच्या सेटवर उपस्थित असलेले एक पत्रकार आणि एक सहाय्यक दिग्दर्शक यांनीही तनुश्रीच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. त्यांनी कबूल केलं की, सेटवरील वातावरण खराब होतं आणि शूटिंगमधून निघून गेल्यानंतर तनुश्रीच्या गाडीवर हल्ला झाला होता. असं असूनही, आज तिच्याकडून शांत आणि संयमी राहण्याची अपेक्षा केली जाते. संपूर्ण देश तिचा छळ करणाऱ्याचं कौतुक करत आहे. जर तुम्ही नाना पाटेकर यांच्या कामामुळे प्रभावित झाला असाल, तर तुमच्या भावना पूर्णपणे योग्य आहेत. पण हेही तितकंच खरं आहे की, तनुश्रीचा छळ झाला होता. केवळ कोणाचा मृत्यू झाला म्हणून ते देवदूत बनत नाहीत.’ असं चिन्मयीनं पुढे म्हटलं.
Tanushree Dutta spoke up in 2018 (Raya Sarkar did before her in 2017 whom nobody listened to)
Tanushree had an event to attend and the was not looking forward to being asked about her harasser’s death.
A journalist and an assistant director who were present on the 2008 film set publicly corroborated parts of her story regarding the hostile environment and the subsequent attack on her car after she walked out of the shoot.
Yet – she is supposed to be polite while the country sings paeans in praise of her harasser.
If you were moved by Nana Patekar’s work – your feeling is valid and so is the fact that she was harassed.
Demise doesn’t make one an angel.
Whether it is Birju Maharaj or Nana Patekar.
— Chinmayi Sripaada (@Chinmayi) October 9, 2026
ट्रोलिंगबद्दल तनुश्री दत्ता काय म्हणाली?
नाना पाटेकर यांना ‘ईविल डेड’ म्हटल्याबद्दल तनुश्रीला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर तनुश्री एक व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘मला सोशल मीडियावर का ट्रोल केलं जात आहे? मला समजत नाही. ज्या व्यक्तीनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, गुंड पाठवून माझा छळ केला आणि माझं काम खराब केलं, त्याला मी ‘ईविल डेड’ म्हटलं आणि एवढा गोंधळ झाला.’
दरम्यान, #MeToo चळवळीदरम्यान तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. पण, अभिनेत्यानं हे आरोप फेटाळून लावले होते.
