
गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्री चित्रपटांच्या सेटवर आपल्यासोबत काय काय घडले हे सांगताना दिसतात. कधी चित्रपट निर्माताच अभिनेत्रीच्या रूममध्ये घुसून बळजबरी करतो तर कधी अभिनेता. आता नुकताच फराह खान हिने चित्रपटसृष्टीतील तिचा एक अत्यंत वाईट असा अनुभव सांगितला. कशाप्रकारे चित्रपट निर्माता तिच्या रूममध्ये शिरून बेडवर येऊन काय करत होता. वयाच्या 15 व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत फराह खान काम करते. अत्यंत वाईट परिस्थिती असताना फराह खानने काम करण्यास सुरूवात केली. कोरिओग्राफर म्हणून अनेक वर्षांपासून एक वेगळीच छाप फराह खानने सोडली आहे. बॉलिवूडमधील हा प्रवास नक्कीच इतका सोपा नव्हता, असे सांगताना फराह खान दिसली.
नुकताच काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच’ या चॅट शोमध्ये बोलताना फराह खान इंडस्ट्रीमध्ये महिलांना होणाऱ्या छळाबद्दल सांगताना दिसली. फराह खान हिने सांगितले की, ती कोरिओग्राफर म्हणून काम करत असताना एका दिग्दर्शकाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तो थेट तिच्या रूममध्ये घुसला. फराह खान म्हणाली, मी झोपेत असताना तो गाण्यांवर किंवा काहीतरी चर्चा करण्यासाठी माझ्या खोलीत आला आणि माझ्या शेजारी बसला.
तो ज्यावेळी माझ्या शेजारी बसला होता, त्यावेळी मी झोपेत होते. मला त्याला तिथून हाकलून दिले. हेच नाही तर फराह खानने म्हटले की, त्यावेळी माझ्यासोबत ही घटना घडली, त्यावेळी तिथे ट्विंकल खन्ना देखील उपस्थित होती. यावर ट्विंकल म्हणाली की, होय तो तिच्या मागे लागला होता. फराह खानने मोठा खुलासा करत म्हटले की, मी त्या व्यक्तीला लाथ घालून हाकलून दिले होते. काही वाईट अनुभव आल्याचेही सांगताना फराह खान दिसली.
पुढे बोलताना फराह खान म्हणाली की, मी माझ्या आयुष्यात इतका जास्त वाईट काळ बघितला आहे की, मी अजूनही काम करते. माझा वाईट काळ मला काम करण्यासाठी प्रेरित करतो. मी लहानपणी पैसे अजिबात बघितले नाहीत. मग मला वाटते की, मी प्रत्येक दिवशी काम करत राहिले तर माझ्या मुलांना पैशांची कमी होणार नाही. फराह खानने तिच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे.