Jamaica To India : ख्रिस गेलच्या डान्स मूव्ह पाहून बॉलिवूडकरही होतील हैराण, नवीन गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ!

Jamaica To India : ख्रिस गेलच्या डान्स मूव्ह पाहून बॉलिवूडकरही होतील हैराण, नवीन गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ!
ख्रिस गेल

सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा माहोल सुरू झाला आहे. किंग इलेव्हन पंजाबचा प्रसिद्ध खेळाडू ख्रिस गेल (Cris Gayle) पुन्हा एकदा आपला खेळ खेळण्यास सज्ज झाला आहे.

Harshada Bhirvandekar

|

Apr 12, 2021 | 2:33 PM

मुंबई : सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा माहोल सुरू झाला आहे. किंग इलेव्हन पंजाबचा प्रसिद्ध खेळाडू ख्रिस गेल (Cris Gayle) पुन्हा एकदा आपला खेळ खेळण्यास सज्ज झाला आहे. मात्र, त्याआधी ख्रिस गेल 11 एप्रिल रोजी रिलीज झालेल्या त्याच्या नवीन म्युझिक व्हिडीओमुळे बर्‍याच चर्चेत आला आहे. या गाण्याचे बोल आहेत ‘जमैका टू इंडिया’ (Chris gayle new song Jamaica To India trending on youtube).

ख्रिस गेलचे हे गाणे यूट्यूबवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. या गाण्यासाठी ख्रिस गेलने भारतीय रॅपर अ‍ॅमीवे बंटायबरोबर काम केले आहे. गाण्याच्या व्हिडीओमध्ये आपण पाहु शकता की, ख्रिस गेल हॉट मुलींच्या गराड्यात आहे आणि त्याच्या आपल्या डान्स मुव्ह्जनी प्रत्येकाचे मन जिंकत आहे. ख्रिस गेलच्या डान्स मूव्हज पाहून बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनाही घाम फुटू शकतो.

पाहा ख्रिस गेलचे नवे गाणे

हे गाणे यूट्यूबवर प्रथम क्रमांकावर ट्रेंड करत आहे. आतापर्यंत 40 लाखाहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे. या गाण्यातील ख्रिस गेलची स्टाईल लोकांना खूप पसंत पडली आहे. ख्रिस गेलला भारतीय गाणी खूप आवडतात. त्याचे बरेच व्हिडीओ व्हायरल देखील झाले आहेत, ज्यात ते बॉलिवूडपासून सपना चौधरीच्या अनेक गाण्यांवर नाचताना दिसत आहेत (Chris gayle new song Jamaica To India trending on youtube).

ख्रिस गेलीची खेळी

सध्या ख्रिस गेलच्या क्रिकेट कारकीर्दीचा विचार करायचा असेल तर कदाचित हा त्याचा आयपीएलचा शेवटचा हंगाम असेल. तथापि, ख्रिस गेलच्या बाबतीत काहीही शक्य आहे. कधीकधी ख्रिस गेलची फलंदाजी चालत नाही तर काहीवेळा तो चौकार आणि षटकारांसह आपला जलवा दाखवतो, ज्याची कोणालाही अपेक्षा देखील नसते. कदाचित आयपीएलच्या या मोसमातही ख्रिस गेल पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित करू शकतो.

‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ आणि ‘राजस्थान रॉयल्स’ यांच्यात सोमवारी होणारा सामना हा या हंगामातील आयपीएलचा चौथा सामना आहे. मागील हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी अतिशय निराशाजनक कामगिरी बजावली होती. आता त्यांच्या भूतकाळातील चुकांचा धडा घेत किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएलचे यंदाचे विजेतेपद जिंकू शकेल का?, हे पाहावे लागेल.

(Chris gayle new song Jamaica To India trending on youtube)

हेही वाचा :

फ्लॉप चित्रपटांना वैतागून अभिषेकने घेतला होता मनोरंजन विश्वाचा निरोप घेण्याचा निर्णय, मग अमिताभ म्हणाले…

Sharvani Pillai | अभिनेत्री शर्वाणी पिल्लईची नवी इनिंग, ‘माऊची लाडकी आई करणार नव्या क्षेत्रात पदार्पण!


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें