AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी नाना पाटेकर अन् आता..; अत्यंत खास व्यक्तीला गमावल्यानंतर शिवाजी साटम भावूक, म्हणाले ‘आयुष्यातील सर्वात मोठं पर्व संपलं..’

Shivaji Satam: 'सीआयडी' या मालिकेचे निर्माते बी. पी. सिंह यांच्या निधनानंतर अभिनेते शिवाजी साटम यांनी शोक व्यक्त केला आहे. आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं पर्व संपलं आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

आधी नाना पाटेकर अन् आता..; अत्यंत खास व्यक्तीला गमावल्यानंतर शिवाजी साटम भावूक, म्हणाले 'आयुष्यातील सर्वात मोठं पर्व संपलं..'
Shivaji SatamImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2026 | 10:50 AM
Share

Shivaji Satam: ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेत एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम सध्या दुःखात आहेत. ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांचे निर्माते-दिग्दर्शक बी.पी. सिंह यांच्या निधनाने त्यांना मोठा धक्का बसला आहे. बी.पी. सिंह हे केवळ त्यांचे सहकारी नव्हते, तर जवळचे मित्र आणि गुरूही होते. त्यांच्या निधनानंतर शिवाजी साटम यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया दिली. तसंच भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी बी.पी. सिंह यांना पद्मश्री पुरस्कार मिळायला हवा होता, अशी भावना व्यक्त केली.

‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शिवाजी साटम म्हणाले, “आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं पर्व संपलं आहे. ते खूप चांगले माणूस होते आणि एक उत्तम मित्र होते. मी जे काही शिकलो, ते सगळं त्यांच्याकडूनच शिकलो. मी रंगभूमीवरून आलो होतो, त्यामुळे रंगमंचावर अभिनय कसा करायचा, हे मला चांगलं माहीत होतं. पण कॅमेऱ्यासमोर अभिनय कसा करायचा, हे त्यांनी मला शिकवलं. गरज पडल्यास प्रत्येक प्रसंग अधिक भव्य आणि प्रभावी कसा बनवायचा, हेही मी त्यांच्याकडूनच शिकलो. ते प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगायचे. ते खूप चांगले शिक्षक होते.”

आपले मित्र बी.पी. सिंह यांची आठवण सांगताना शिवाजी साटम पुढे म्हणाले, “मैत्रीत गैरसमज आणि भांडणं होतच असतात, पण ते माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत होते. आमचं नातं इतकं घट्ट होतं की कोणत्याही छोट्या गोष्टीमुळे ते तुटू शकत नव्हतं. ते अतिशय दमदार व्यक्ती होते. ते खूप चांगले मित्र होते आणि त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. त्यांच्यासारख्या व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार मिळायला हवा होता. पण त्यांनी काम करताना कधीही या गोष्टीचा विचार केला नाही. ते नेहमी म्हणायचे, ‘जाऊ दे, यामुळे काय बदलणार आहे?’ आपले प्रेक्षक नेहमीच आमच्या पाठीशी आहेत, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी आहे.”

‘सीआयडी’ला घराघरांत पोहोचवणारे बी.पी. सिंह

बी.पी. सिंह यांचं पूर्ण नाव बृजेंद्र पाल सिंह होतं. त्यांनी 1998 मध्ये ‘सीआयडी’ ही मालिका सुरू केली. गुन्ह्यांचा तपास, रहस्य आणि उत्कंठावर्धक कथानक यामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. दोन दशकांहून अधिक काळ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिली. ‘आहट’ या भयपट मालिकेच्या निर्मितीमुळेही ते विशेष लोकप्रिय झाले. बी.पी. सिंह यांचं 27 ऑक्टोबर 2026 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एका महत्त्वाच्या पर्वाचा अंत झाला आहे.

Follow Us
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र