5

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, केंद्राची मोठी घोषणा!

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. आता यानुसार देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेसह सुरू होतील.

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, केंद्राची मोठी घोषणा!
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 9:30 AM

मुंबई : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. आता यानुसार देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेसह सुरू होतील. कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली होती. याचा फटका चित्रपटांना बसताना दिसत होता. यामुळे अनेकांना आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले होते. (cinemas hall will start operating at 100% capacity from February 1)

मात्र, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली असली तरी देखील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्यासाठी बऱ्याच नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. याचे पालन चित्रपटगृह व्यवस्थापनाला करावे लागणार आहे. The

1. चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीतकमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल.

2. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोडाला मास्क बंधनकारक आहे.

3. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.

4. चित्रपटगृहांच्या परिसरात थुंकण्यास कडक निषिद्ध

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत होते. 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू होते. यामुळे बिग बजेटचे चित्रपट रिलीज केले जात नव्हते त्यापैकीच सूर्यवंशी हा चित्रपट होता. बॉलिवूडमध्ये अनेक निर्माते चित्रपटगृहे 100 टक्यांने सुरू होण्याची वाट गेल्या अनेक दिवसांपासून पाहात होते.

आता 50 टक्क्यांनी चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे बॉलिवूडमधील एकापेक्षा एक बिग बजेटचे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट देखील आहे. अयान मुखर्जी यांनी हा दिग्दर्शित केला आहे. 2018 पासून सुरू असलेल्या या चित्रपटाचे बजेट तब्बल 300 कोटींच्या घरात गेले आहे.

संबंधित बातम्या : 

Release date | अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला!

Radhe vs SMJ 2 | सलमान विरुद्ध जॉन अब्राहम ‘सामना, कोण मारणार बाजी?

ऐतिहासिक क्षणांचा चित्रपट ’83’ होळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

(cinemas hall will start operating at 100% capacity from February 1)

Non Stop LIVE Update
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'