AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP: वेळ खराब, आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल; आंदोलन करणाऱ्या तरुणांना ‘रामायण’चे सुनिल लहरी स्पष्टच बोलले..

सुनिल लहरी यांच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या व्हिडीओची चर्चा होत आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या..

CJP: वेळ खराब, आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल; आंदोलन करणाऱ्या तरुणांना 'रामायण'चे सुनिल लहरी स्पष्टच बोलले..
आंदोलन करणाऱ्या तरुणांना सुनील लहरी यांचा सल्लाImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 11, 2026 | 10:03 AM
Share

रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारून घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते सुनिल लहरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या अभिनयामुळे नव्हे, तर तरुणांना दिलेल्या एका महत्त्वाच्या संदेशामुळे ते चर्चेत आहेत. देशातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून, कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला आहे. ‘वेळ खूप खराब सुरू आहे. एका चुकीमुळे आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो’, अशा शब्दांत त्यांनी तरुणांना सावध केलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

सुनिल लहरी यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, अनेकदा लोक ऐकीव माहितीवर विश्वास ठेवतात. काही जण आपल्याला जे दाखवू इच्छितात, ते पाहून आपण त्यावर विचार न करता विश्वास ठेवतो. त्यामुळे कधी कधी आपण चुकीच्या गोष्टींच्या बाजूने उभे राहतो आणि नंतर त्याचा पश्चात्ताप करावा लागतो. याबाबत तरुणांना सावध करताना सुनिल लहरी म्हणाले की, कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी स्वतःच्या बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे. केवळ कोणीतरी सांगितलं किंवा सोशल मीडियावर एखादी गोष्ट दिसली, म्हणून तिच्यावर लगेच विश्वास ठेवू नये. माहितीची सत्यता तपासणं आणि परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे.

सुनिल लहरी यांचा व्हिडीओ

‘हलक्या कानाचे होऊ नका, डोळे असून आंधळे होऊ नका. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करा’, असा संदेश त्यांनी दिला. सध्याचा काळ संवेदनशील असल्याचं सांगत सुनिल लहरी यांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलण्याचा सल्ला दिला. एखाद्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीच्या प्रभावाखाली येऊन घाईघाईने निर्णय घेऊ नका, असं त्यांनी म्हटलं. विशेषतः तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत भावनेच्या भरात चुकीचं पाऊल उचलू नये, यावर त्यांनी भर दिला.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओची चर्चा

सुनिल लहरी यांचा हा व्हिडीओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे