Trisha-Vijay : त्रिशावर फक्त एक कमेंट आणि दोस्ती दुश्मनीमध्ये बदलली, विधानसभेत विजय-उदयनिधी स्टॅलिन आमने-सामने येताच..

Trisha-Vijay : त्रिशाबद्दल दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी... मुख्यमंत्री विजय आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांची मैत्री बदलली दुश्मनीत... विधानसभेत दोघे आमने सामने येताच..., व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल

Trisha-Vijay : त्रिशावर फक्त एक कमेंट आणि दोस्ती दुश्मनीमध्ये बदलली, विधानसभेत विजय-उदयनिधी स्टॅलिन आमने-सामने येताच..
Trisha-Vijay
| Updated on: Aug 14, 2026 | 8:30 AM

Trisha Krishnan: तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री विजय आणि माजी मुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या मैत्रीचं रुपांतर दुश्मनीत झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विजय आणि स्टॅलिन यांच्यात फक्त 3 वर्ष आणि 5 महिन्यांचं अंतर आहे. विजय हे स्टॅलिन यांच्यापेक्षा मोठे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी स्टॅलिन यांची घरी जाऊन भेट घेतली. पण ही भेट राजकारणा चर्चेचा विषय ठरली. पण आता दोघांमध्ये असलेली दुश्मनी कोणत्या पातळीवर पोहोचली आहे, याबद्दल एक गोष्ट समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर त्रिशाबद्दल दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यातसुद्धा घेतलं होतं. आता याचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळत आहेत. विजय विधानसभेत आले तेव्हा सर्व सदस्य त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. पण उदयनिधी जागेवरच बसून राहिले.

अशात मुख्यमंत्री पदाचा सन्मान न केल्यामुळे आता ज्युनियर स्टॅलिन यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकरी कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. एका पोस्टमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की, ‘मुख्यमंत्री हे पद कोणत्या पक्षाची खासगी संपत्ती नाही. ही तामिळनाडूच्या जनतेकडून मिळालेल्या लोकशाही जनादेशातून निर्माण झालेली घटनात्मक जबाबदारी आहे. या पदावर असलेल्या व्यक्तीचा आदर करणं म्हणजे त्या व्यक्तीची गुलामी करणं असं होत नाही; तर तो जनतेच्या लोकशाही अधिकारांचा आणि विधानसभेच्या प्रतिष्ठेचा सन्मान आहे.’

 

विधानसभा दुश्मनीचं ठिकाण नाही…

उदयनिधी स्टॅलिन यांनी सर्वप्रथम विधानसभेतील शिष्टाचार शिकायला पाहिजेत आणि हे वयाने ज्येष्ठ व प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या नेत्यांकडूनच उत्तमरीत्या शिकता येतात. राजकीय दुश्मनी दाखवण्याचं ठिकाण म्हणजे विधानसभा नव्हे. उदयनिधी स्टॅलिन नक्कीच राजकीय विरोध करू शकतात, परंतु त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा कमी होईल अशा प्रकारे वागू नये. तामिळनाडूतील जनता या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून आहे. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

विजय आणि स्टॅलिन यांचं एकाच कॉलेजमध्ये झालंय शिक्षण

विजय आणि स्टॅलिन यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं आहे. चेन्नई येथील लोयोला कॉलेज येथे दोघांनी देखील शिक्षण घेतलं आहे. दोघांमध्ये विजय सिनिअर होते. कॉलेजनंतर त्यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. तर उदयनिधी यांची प्रॉडक्शन कंपनी ‘ड जाइंट मूवीज’ 2008 मध्ये प्रदर्शित केलेल्या ‘कुरुवि’ (Kuruvi) सिनेमातून विजय यंचा खरा प्रवास सुरु झाला.

सांगायचं झालं तर, एकेकाळी कॉलेजमधील मित्र आणि चित्रपटसृष्टीतील सहकारी असलेले हे दोघे आता तमिळनाडूच्या राजकारणात आमने – सामने आले आहेत. त्रिशा कृष्णन हिच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us