AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: घाणेरडे कृत्य करुन फुटेज हवे; नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्रीने आरोप करताच अभिनेता संतापला

Nana Patekar: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता सतत त्यांच्याविरोधात व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे. तिने नानांवर अनेक आरोप केले. त्यानंतर आता सुनील पाल यांनी तीव्र प्रतिक्रिया देत तनुश्रीवर प्रसिद्धीसाठी नाना पाटेकर यांना बदनाम करण्याचा आरोप लावला आहे.

Nana Patekar: घाणेरडे कृत्य करुन फुटेज हवे; नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्रीने आरोप करताच अभिनेता संतापला
Nana PatekarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 12:37 PM
Share

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ता आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. तनुश्री दररोज एक नवीन व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती फक्त नाना पाटेकर यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे लोक तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करताना दिसत आहेत. अभिनेत्रीला उत्तर देण्यासाठी नाना आता या जगात नाहीत. मात्र त्यांचे चाहते गप्प बसलेले नाहीत आणि तनुश्रीला खडे बोल सुनावले आहेत. आता कॉमेडियन सुनील पाल यांनी तनुश्रीला उत्तर देत चपराग लगावली आहे.

सुनील पाल यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ते बोलताना दिसत आहेत की, तनुश्री, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, जर तुमचे डोके काम करत नसेल, तर विश्रांती घ्या. जिथे तुम्ही १० वर्षे गायब होता, तिथे विश्रांती घ्या. पण आमचे महान नाना पाटेकर साहेब, जे धरतीपुत्र आहेत. ज्यांनी धरतीची सेवा केली, शेतकऱ्यांची सेवा केली, आर्मीत राहिले. जय जवान, जय किसान हे उद्गार मनात बाळगून चालले. धरतीवर थिएटरची सेवा केली. कलाकारांची सेवा केली. दिखाव्यात राहिले नाहीत. नेहमी साधे कपडे घातले. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल ज्याप्रकारे बोलत आहात ना… भयानक… डेव्हिल… तुम्हाला काय हवे आहे? असे घटिया कृत्य करून प्रसिद्धी हवी आहे का?

अभिनेत्याने चांगलेच सुनावले

सुनील पाल पुढे म्हणाले की, संपूर्ण नारी समाज तुमच्यावर चिडलेला आहे. देवी समाजही तुमच्यावर चिडलेला आहे. तुम्ही काय कृत्य करत आहात? नाना पाटेकर साहेबांनी असे काय केले? आम्ही तुम्हाला ‘आशिक बनाया’ आणि अशा अनेक चित्रपटांत पाहिले आहे. तर इतके ड्रामा करू नका. तुम्हाला कोणतेही मीडिया फुटेज मिळणार नाही.

ते पुढे म्हणले की, ‘तनुश्री जी, तुम्ही चेटकीण तरी नाही ना? मग चेटकीणीसारखे कृत्य करू नका. सर्वांना विनंती आहे की, या महिलेला फुटेज देऊ नका. ही वेडी झाली आहे. ही प्रसिद्धी आणि वाद निर्माण करण्यासाठी काहीही करत आहे.’ सुनील पाल यांचा आरोप आहे की, तनुश्री फक्त लाइमलाईटमध्ये येण्यासाठी नाना पाटेकर यांना बदनाम करत आहे. आता तनुश्री यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका