छावा पाहून माजी क्रिकेटरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला “छत्रपती संभाजी महाराजांबद्दल…”

छावा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालतोय. प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि कौतुक या चित्रपटाला मिळत असतानाच छावा पाहून माजी क्रिकेटरने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे.

छावा पाहून माजी क्रिकेटरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल...
| Updated on: Feb 19, 2025 | 2:08 PM

छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनावर तो कायमचा कोरला गेला. काही प्रेक्षकांनी तर हा चित्रपट दोन ते तीन वेळा पाहिला. प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि कौतुक या चित्रपटाला मिळताना दिसत आहे. एवढंच काय तर थिएटरमध्ये आजही शो हाऊसफुल दिसत आहेत.

छावाने पुष्पाचेही रेकॉर्ड मोडले 

सिनेमा पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत. विकी कौशलपासून ते चित्रपटातील सर्व कलाकारांचं कौतुक होत आहे. विकीने संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचंही तेवढंच कौतुक केलं जात आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पुष्पाचेही रेकॉर्ड मोडले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

छावा पाहून माजी क्रिकेटरची संतप्त प्रतिक्रिया

या चित्रपटाचं सर्व सेलिब्रिटींनीही तेवढंच कौतुक केलं आहे. त्यात आता छावा चित्रपटाबद्दल एका माजी क्रिकेटपटूनेही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान या माजी क्रिकेटरने छावा पाहून एका गोष्टीसाठी संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे.

“शाळेत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल का शिकवलं नाही?”

हा क्रिकेटर आहे आकाश चोप्रा. छावा चित्रपट पाहिल्यानंतर आकाश चोप्राने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘आज छावा पाहिला. शौर्य, निस्वार्थी भाव आणि कर्तव्याच्या जाणिवेची अविश्वसनीय कथा. पण खरा प्रश्न हा आहे की, आम्हाला शाळेत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल का शिकवलं नाही? त्यांचा कुठेही उल्लेख का नव्हता?,’ असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

“हे असं का आणि कसं झालंय?”

संभाजी महाराजांबद्दल शाळेत काही शिकलो नाही. पण अकबर हा एक महान आणि न्यायी सम्राट कसा होता हे आम्हाला शिकवले. दिल्लीतल्या प्रमुख रस्त्याला औरंगजेबाचे नाव दिले आहे. हे असं का आणि कसं झालंय? असे आकाश चोप्राने पोस्टमध्ये असं लिहित खंत व्यक्त केली आहे. या पोस्टच्या खाली नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

दरम्यान 14 फेब्रुवारी रोजी भारतासह जगभरात प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपटाने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं. आणि सर्वांच्याच ओठांवर या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 150 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे कलेक्शन केले आहे.