AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : विराट कोहली आणि अनुष्काच्या अलिबागमधील घरातील व्हिडीओ व्हायरल, अनुभव शेअर करत घराचा कोपरा न्…

Virat Kohli and Anushka Sharma Alibaug Home : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. फक्त भारतामध्येच नाहीतर विदेशातही यांचे अत्यंत आलिशान घर आहेत. मुंबईसह आता आलिबागला देखील यांचे नवीन घर झाले आहे. नुकताच विराट कोहली याने आपल्या आलिबागच्या घराची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे.

Video : विराट कोहली आणि अनुष्काच्या अलिबागमधील घरातील व्हिडीओ व्हायरल, अनुभव शेअर करत घराचा कोपरा न्...
Virat Kohli and Anushka Sharma
| Updated on: Jul 11, 2024 | 11:46 AM
Share

क्रिकेटर विराट कोहली हा T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करताना दिसला. यानंतर विराट संघासोबत भारतामध्ये परतला आणि लगेचच अनुष्का शर्मा आणि आपल्या मुलाला आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला गेला. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे की, विराट कोहली हा लंडनमध्येच शिफ्ट होणार आहे. अनुष्का शर्मा हिने मुलाला जन्म देखील लंडनमध्येच दिलाय. मात्र, खरोखरच विराट कोहली आणि अनुष्का लंडनमध्येच कायमचे राहणार की, नाही? यावर अजूनही काही खुलासा होऊ शकला नाहीये. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याची चर्चा असतानाच आता विराटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. हेच नाहीतर विराट कोहली याने चक्क आपल्या घराची झलक दाखवलीये. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे हे घर अत्यंत आलिशान असल्याचे बघायला मिळतंय. अनेक सुविधा या घरात आहेत. मोठा स्विमिंग पूलही बघायला मिळतोय.

व्हिडीओमध्ये विराट कोहली घराच्या विविध भागांमध्ये फिरताना दिसतोय. एक मोठा हॉल सुरूवातीला दिसतोय. यासोबतच विराट आणि अनुष्काच्या घरातील किचन देखील दिसत आहे. मस्त हवेशीर बसून जेवणासाठी खास टेबल देखील आहे. यासोबतच गार्डन परिसरात व्यायाम करताना विराट कोहली हा दिसत आहे. अत्यंत खास प्रकारे हे घर डिझाईन करण्यात आल्याचे बघायला मिळतंय.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विशेष म्हणजे ज्यावेळी घराचे बांधकाम सुरू होते, त्यावेळीही विराट कोहली पाहणी करण्यासाठी तिथेच पोहोचल्याचे व्हिडीओमध्ये आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या स्वप्नातील हे घर असल्याचे बघायला मिळतंय. आपल्या घराबद्दल माहिती सांगताना विराट कोहली हा व्हिडीओमध्ये दिसत आहे. हॉलिडेमध्ये राहण्यासाठी हे घर अगदी बरोबर आहे.

विशेष म्हणजे हे अत्यंत खास असे घर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे मुंबईच्या अत्यंत जवळ आलिबाग येथेच आहे. आता विराट कोहली याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. विराट कोहली याच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कधीच त्यांच्या मुलाचा आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाहीये.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.