Birth Anniversary | केवळ 15 हजारांत बनला होता भारतातील पहिला चित्रपट, दादासाहेब फाळके स्वतः बनले होते अभिनेता!

भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांचे खरे नाव ‘धुंडिराज गोविंद फाळके’ असे होते. त्याचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक असण्याबरोबरच चांगले लेखक देखील होते.

Birth Anniversary | केवळ 15 हजारांत बनला होता भारतातील पहिला चित्रपट, दादासाहेब फाळके स्वतः बनले होते अभिनेता!
दादासाहेब फाळके
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 11:56 AM

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा सन्मान, दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) पुरस्कार दरवर्षी मनोरंजन विश्वात विशेष कामगिरी करणाऱ्या खास लोकांना देण्यात येतो. गेल्या 5 दशकांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना हा पुरस्कार मिळत आहे. पण ज्यांचे नावे हा पुरस्कार दिला जातो, भारतात चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ते दादासाहेब फाळके कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? आज त्यांच्या जयंती निमित्ताने आपण काही खास गोष्टी जाणून घेऊया…(Dadasaheb Phalke Birth Anniversary special his first film story)

भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांचे खरे नाव ‘धुंडिराज गोविंद फाळके’ असे होते. त्याचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक असण्याबरोबरच चांगले लेखक देखील होते. 19 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 95 हून अधिक चित्रपट केले.

दादासाहेब फाळके यांना नेहमीच कलेत रस होता. त्यांना याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती. 1885मध्ये त्यांनी जे जे कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. यासह त्यांनी वडोदरा येथील कलाभवन येथून पुढचे शिक्षण देखील पूर्ण केले. 1890मध्ये दादासाहेब वडोदरा येथे गेले जेथे त्यांनी काही काळ छायाचित्रकार म्हणून काम केले. आपली पहिली पत्नी आणि मुलाच्या निधनानंतर त्यांनी आपली नोकरी सोडली.

अशा प्रकारे घेतला पहिला चित्रपट बनवण्याचा निर्णय

त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी आपली प्रिंटींग प्रेस सुरू केली. भारतीय कलाकार राजा रवी वर्मा यांच्याबरोबर काम केल्यानंतर ते प्रथमच भारताबाहेर जर्मनीला गेले. जिथे त्यांनी आपल्या जीवनातील पहिला चित्रपट ‘दि लाइफ ऑफ क्राइस्ट’ पाहिला आणि पहिला चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. पहिला चित्रपट करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. हा चित्रपट तयार करण्यासाठी त्यांना सहा महिने लागले (Dadasaheb Phalke Birth Anniversary special his first film story).

पत्नी व मुलाच्या मदतीने दादासाहेबांनी पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला. हा चित्रपट तयार करण्यासाठी त्यांना 15 हजार रुपये लागले. आज जरी किरकोळ वाटत असली, तर त्या काळात ही एक मोठी रक्कम होती. स्वत: दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्रमध्ये अभिनय केला होता. त्यांची पत्नी पोशाख काम करत होती आणि त्यांच्या मुलाने हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका केली होती. कोणतीही महिला काम करण्यास तयार नसल्यामुळे दादासाहेबांच्या चित्रपटात स्त्री पात्राची भूमिकाही एका पुरुषाने साकारली होती.

हा चित्रपट 3 मे 1913 रोजी मुंबईतील कोरोनेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आणि तो सुपरहिट असल्याचे सिद्ध झाले. अशा प्रकारे दादासाहेब फाळके यांनी भारतात चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली.

(Dadasaheb Phalke Birth Anniversary special his first film story)

हेही वाचा :

‘नाव सुचत नव्हतं, इतक्यात त्यांनी दरवाजा ठोठावला..’, वाचा ‘धनंजय माने इथेच राहतात का?’चा किस्सा…

Rang Maza Vegla | कार्तिकच्या आरोपांनंतर घर सोडण्याचा निर्णय, कठीण काळात कोण देणार दीपाची साथ?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.