AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळेंचं नाव घेत अभिनेता म्हणाला, ‘हातात एक काठी… छातीत – पोटात गोळ्या तरीही…’

26/11 Terror Attack : आमच्या महाराष्ट्राचा मावळा तुकाराम ओंबळे... 'Day 1 as spy इन पाकिस्तान' ट्रेंड सुरु असताना अभिनेत्याने करुन दिली ओंबळेंची आठवण... व्हिडीओ पाहून म्हणाल...

26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळेंचं नाव घेत अभिनेता म्हणाला, 'हातात एक काठी... छातीत - पोटात गोळ्या तरीही...'
Tukaram Omble
| Updated on: Dec 21, 2025 | 11:56 AM
Share

26/11 Terror Attack : सोशल मीडियावर सोशल मीडियास्टार ‘Day 1 as spy इन पाकिस्तान’ यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत. सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमाच्या पार्श्वभूमीवर ‘Day 1 as spy इन पाकिस्तान’ असा ट्रेंड सुरू झाला आहे. यावर अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, यावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने संताप व्यक्त केलेला. तर अभिनेता आयुष साळुंके याने देखील एक व्हिडीओ पोस्ट करत कसाबला जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांची आठवण करु दिली आहे.

आयुष संजीव याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याला कोणातरी विचारलं की, ‘नाम क्या है…’ यावर आयुष याने स्वतःचे नाव न घेता तुकाराम ओंबळे यांचं नाव घेत म्हणाला, ‘तुकाराम ओंबळे… बरोबर ऐकलं तुकाराम ओंबळ…’ ट्रेंड सुरु होता म्हणून म्हटलं आपण देखील हात धुवून घ्यावा… ‘हमजा अली मजारी’ हे फिक्शनल कॅरेक्टर आपण फेमस करतोय…त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. पण, तुकाराम ओंबळे….

तुकाराम ओंबळे यांच्याबद्दल अभिनेता पुढे म्हणाला, ‘तुकाराम ओंबळे आपले खरे हिरो… ज्यांनी अजमल कसाब याला पकडलं… आमच्या महाराष्ट्राचा मावळा तुकाराम ओंबळे… हातात फक्त एक काठी… छातीवर – पोटात गोळ्या खात असताना देखील कसाब याला सोडलं नाही…’

‘आज अजमल कसाब याचं नाव जगाला माहिती आहे. पण तुकाराम ओंबळे यांचं नाव फार कमी लोकांना माहिती आहे… म्हणूनच मला सांगायचं आहे की, तुकाराम ओंबळे साहेब…तुमचे पराक्रम आणि नाव आम्ही कोणाला विसरू देणार नाही. जय हिंद…जय महाराष्ट्र…’ असं देखील अभिनेत पोस्टच्या शेवटी म्हणाला आहे…

व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘नाम भुलना नही…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील अभिनेता आयुष साळुंके याची पोस्ट आवडली आहे. अनेकांनी पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश.