
प्रेगन्सीची घोषणा, त्यानंतर मुलीचा जन्म, यामुळे गल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ अभिनेत्री दीपिका पडूकोण ही मोठ्या पडद्यापासून दूरच आहे. ती शेवटची कल्की या चित्रपटात दिसली मात्र त्यानंतर ती कोणत्या नव्या चित्रपटात झळकली नाही. सध्या ती किंगच्या शूटिंगमध्ये व्यस्त असली तरी त्यापेक्षाही ती जास्त चर्चेत आहे ते तिच्या एका मागणीमुळे. दीपिकाने केलेली 8 तासांच्या शिफ्टच्या मागणीही इंटस्ट्रीत चर्चेचा विषय ठकरली असून त्यामुळेच दीपिका आत्तापर्यंत 2 चित्रपटांमधून देखील बाहेर पडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, दीपिका पदुकोणच्या या मागणीवर विविध सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. आता प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीनेही या मागणीवर मौन सोडत तिचं म्हणणं मांडलं आहे.
काय म्हणाली राणी मुखर्जी ?
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री राणी मुखर्जीने या विषयावर भाष्य केलं. ‘मी तुम्हाला त्या काळाची आठवण करून देऊ इच्छिते जेव्हा मी ‘हिचकी’ चित्रपट केला होता. कारण मी त्या चित्रपटाचं काम करत होते तेव्हा माझी लेक आदिरा फक्त 14 महिन्यांची होती. आणइ मी तेव्हा तिला स्तनपान (ब्रेस्टफीड) करत होते. मला सकाळी उठून, दूध पंप करून निघावे लागायचे. शूटिंगसाठी मी मुंबईतील कॉलेजला जायचे. त्यामुळे, ट्रॅफिक जाममध्ये माझ्या घरापासून तिथे पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागायचे. म्हणऊनच मी सकाळी आदिरासाठी दूध पंप करून ठेवायचे, 6:30 च्या सुमारास निघण्याचं रूटीन मी ठरवलं होतं” असं राणीने नमूद केलं.
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘माझा पहिला शॉट सकाळी 8 वाजता असायचा आणि मी दुपारी 12:30- 1 पर्यंत सगळं काम आटपायचे. मी हे नक्की सांगेन की माझ्या युनिटने आणि माझ्या दिग्दर्शकाने इतके नियोजन केले होते की मी शहरातील वाहतूक सुरू होण्यापूर्वीच 6-7 तासांचे शूटिंग पूर्ण करायचे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत घरी पोहोचायचे. मी माझा चित्रपट अशा प्रकारे पूर्ण केला .’ असंही राणी म्हणाली.
वेळेच्या फ्लेक्झिबिलीटीबद्दल (लवचिकता) बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, ” या गोष्टींवर आजकाल चर्चा होत आहे कारण त्यांची चर्चा बाहेरही होऊ शकते, परंतु हे सर्व व्यवसायांमध्ये सामान्य आहे. मी असे काही चित्रपट देखील केले आहेत जिथे मी फक्त ठराविक काळासाठी काम केले आहे. जर प्रोड्युसरला काही अडचण नसेल तर तुम्ही चित्रपटात पुढे काम करा आणि प्रोड्युसरला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो चित्रपट करू नका. हा तर (प्रत्येकाचाः चॉईस आहे, कोणी कोणाला जबरदस्ती करू शकत नाही” असंही राणीने सांगितलं.
8 तासांच्या शिफ्टचा वाद काय ?
अभिनेत्री दीपिका पदुकोण ही दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून बाहेर पडली होती. दीपिकाच्या मागण्यांमध्ये 8 तासांची शिफ्ट आणि फी वाढ यांचा समावेश होता, असे रिपोर्टमधून समोर आले. पण तिच्या या सर्व मागण्यांमुळे दिग्दर्शक संदीप खूश नव्हता, त्यामुळे अखेर दीपिकाला चित्रपटातून बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला. अलिकडेच, अभिनेत्रीने कल्की पार्ट 2 चित्रपटातूनही माघार घेतली. या मागण्या देखील त्यामागचं कारण होत्या.