दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांच्या लेकीचा फोटो व्हायरल, फोटो समोर आले तरी कसे?

Deepika Padukone and Ranveer Singh: दीपिका पादुकोण - रणवीर सिंग यांची लेक दुआ हिचा फोटो सर्वत्र तुफान व्हायरल, फोटो पाहून म्हणाल..., आयुष्यात मुलीची एन्ट्री झाल्यापासून दीपिका - रणवीर सतत खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

दीपिका पादुकोण - रणवीर सिंग यांच्या लेकीचा फोटो व्हायरल, फोटो समोर आले तरी कसे?
| Updated on: Dec 18, 2024 | 10:01 AM

Deepika Padukone and Ranveer Singh: अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. सप्टेंबर महिन्यात दीपिका हिने गोंडस मुलीला जन्म दिला. रणवीर आणि दीपिका यांनी त्यांच्या मुलीचं नाव दुआ पादुकोण सिंह असं ठेवलं आहे. दोघांनी मुलीचं आगमन झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. काही दिवसांपूर्वी दीपिकाने मुलीची पहिली झलक चाहत्यांनी दाखवली होती. अभिनेत्रीने मुलीच्या पायाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना तिच्या नावाचं महत्त्व सांगितलं होतं.

सांगायचं झालं तर, आता सेलिब्रिटी त्यांच्या मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवत आहेत. शिवाय स्वतः देखील मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. दीपिका आणि रणवीर यांनी देखील लेक दुआ हिचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. पण सध्या सोशल मीडियावर काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय असा दावा करण्यात येत आहे की, व्हायरल होत असलेले फोटो दीपिका, रणवीर आणि लेक दुआ यांचा आहे.

 

 

फोटो पाहिल्यानंतर सर्वांना वाटत आहे की, रणवीर आणि दीपिका यांचा लेकीसोबत फोटो व्हायरल होत आहे. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. दोघांनी देखील सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट केले नाहीत. फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. सध्या व्हायरल होत असलेले तिघांचे फोटो फेक आहेत.

सांगायचं झालं तर, आई झाल्यानंतर दीपिका पहिल्यांदा दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला उपस्थित राहिली. कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री आनंदी देखील दिसली. सध्या अभिनेत्रीने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. पण सोशल मीडियावर दीपिका कायम सक्रिय असते.

दीपिका हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘सिंघम अगेन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमात अभिनेत्री शक्ती शेट्टी हिच्या भूमिकेत झळकली. सिनेमात दीपिका हिच्यासोबत अजय देवगन, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान यांसारखे प्रसिद्ध सेलिब्रिटी होते.