Pathaan: “आमचं मिशन पूर्ण झालं”; भगव्या बिकिनीवरील वादादरम्यान ‘पठाण’चे दिग्दर्शक असं का म्हणाले?

दीपिकाला बिकिनी लूकमध्ये का दाखवलं? वादादरम्यान दिग्दर्शकांची प्रतिक्रिया आली समोर

Pathaan: आमचं मिशन पूर्ण झालं; भगव्या बिकिनीवरील वादादरम्यान 'पठाण'चे दिग्दर्शक असं का म्हणाले?
Deepika PadukoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 10:13 AM

मुंबई: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्यावरून मोठा वादसुद्धा निर्माण झाला. ‘बेशर्म रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. भाजपसोबतच विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी या चित्रपटाचा विरोध केला आहे. भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड सीन देत दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप केला जातोय. या वादावर आतापर्यंत बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे. या गाण्यात दीपिकाला बिकिनीमध्ये का दाखवलं, याचं उत्तर आता दिग्दर्शकांनी दिलं आहे.

काय होतं कारण?

पठाणचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाले, “दीपिका ही फक्त इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्री नाही, तर प्रत्येक चित्रपटानुसार ती पुढे पाऊल ठेवताना दिसते. पडद्यावर अत्यंत सहज अभिनय करताना ही ग्लॅमरससुद्धा दिसते. त्यामुळे जर दीपिका तुमच्या चित्रपटात असेल तर तिच्या इमेजसोबत न्याय करण्याची जबाबदारी तुमची आहे.”

बिकिनी लूकच का निवडला या प्रश्नाचं उत्तर देताना ते पुढे म्हणाले, “दीपिकाला तिच्या आतापर्यंतच्या सर्वांत ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात मला या गाण्यात दाखवायचं होतं. ही गोष्ट मी माझ्या टीमला सांगितली आणि दीपिकाला अशा अंदाजात दाखवणं हा आमचं मिशन बनलं. हे मिशन पूर्णसुद्धा झाला.”

हे सुद्धा वाचा

“बेशर्म रंग हे गाणं स्पेनच्या समुद्रकिनारी शूट केलं जाईल असं शूटिंगदरम्यान ठरलं होतं. स्क्रीनवर दीपिकाला जितक्या हॉट अंदाजात दाखवलं जाईल, तितक्या हॉट अंदाजात दाखवावं, असा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार आम्ही काम केलं. आमच्या या निर्णयावर दीपिकासुद्धा खूश होती. तिने आम्हाला तिच्या कॉकेट, हॅप्पी न्यू इअर आणि गहराईयाँ या चित्रपटांमधील लूक पाहण्याचा सल्ला दिला”, असंही दिग्दर्शकांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.