AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ माल्याचा साखरपुडा; कोण आहे होणारी पत्नी?

सिद्धार्थबरोबरच्या ब्रेकअपवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दीपिका म्हणाली होती की, "आमचं नातं वाचवण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण सिद्धार्थची वागणूक दिवसेंदिवस विचित्र बनत चालली होती. या नात्यात मला भविष्य दिसत नव्हतं."

दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ माल्याचा साखरपुडा; कोण आहे होणारी पत्नी?
सिद्धार्त माल्याचा साखरपुडाImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2023 | 7:40 PM
Share

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे माजी मालक विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्याने साखरपुडा केला आहे. सिद्धार्थचं नाव याआधी अभिनेत्री दीपिका पादुकोणशी जोडलं गेलं होतं. दीपिका आणि सिद्धार्थचं अफेअर खूप चर्चेत होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. आता हॅलोवीनच्या पार्टीत सिद्धार्थने त्याची गर्लफ्रेंड जास्मिनशी साखरपुडा केला आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ हा मॉडेल आणि अभिनेतासुद्धा आहे. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत.

सिद्धार्थने पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तो गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोमध्ये जास्मिन तिच्या हातातील डायमंड रिंग दाखवताना दिसतेय. या फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे. हॅलोवीन पार्टीत सिद्धार्थने पंपकिन कॉस्च्युम परिधान केला होता. तर त्याची होणारी पत्नी जास्मिनने पर्पल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सिद्धार्थच्या या फोटोंना कतरिना कैफची बहीण ईशा कैफ आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरने लाइक केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sid (@sidmallya)

जास्मिन आणि सिद्धार्थ हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सिद्धार्थने याआधीही जास्मिनसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या दोघांनी अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नाही. सिद्धार्थ माल्या आणि दीपिका पादुकोण यांचं नातं एकेकाळी खूप चर्चेत होतं. अभिनेता रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर तिचं नाव सिद्धार्थशी जोडलं गेलं होतं. आयपीएल मॅचदरम्यान या दोघांना स्टेडियममध्ये एकमेकांना किस करतानाही पाहिलं गेलं होतं. तेव्हा दीपिका आणि सिद्धार्थच्या नात्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. या दोघांना अनेकदा आयपीएलच्या पार्ट्यांमध्ये आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं.

दीपिका आणि सिद्धार्थचं नातं फार काळ चाललं नाही. ब्रेकअपनंतर दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका म्हणाली होती, “सिद्धार्थ माझ्याशी खूप अजब वागू लागला होता. अखेरचं आम्ही जेव्हा डिनर डेटवर गेलो होतो, तेव्हा त्याने मला बिल भरायला सांगितलं होतं. माझ्यासाठी ही फार शरमेची बाब होती”, असं दीपिका म्हणाली होती.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.