‘गेहराईया’ चित्रपटाच्या गाण्यावर दीपिका रणवीरचा तुफान डान्स, व्हायरल व्हिडीओची चाहत्यांमध्ये चर्चा

रणवीर सिंग आणि दीपीका पदुकोन अनेकदा चर्चेत असतात, त्यांची कारण सुध्दा तशीच असतात. तसेच ते दोघे स्वत:च्या करिअरला घेऊन अधिक सिरीअस असल्याचे समजते.

गेहराईया चित्रपटाच्या गाण्यावर दीपिका रणवीरचा तुफान डान्स, व्हायरल व्हिडीओची चाहत्यांमध्ये चर्चा
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 12:45 PM

मुंबई – बुधवारी दीपिका पदुकोनच्या (deepika padukone) चित्रपट ‘गेहराईया’ (gehraiyaan) या चित्रपटाचं गाण नुकतचं प्रदर्शित झाल आहे. त्या गाण्याचं नाव बेकाबू आहे. त्या गाण्यात तिच्यासोबत अभिनेता सिध्दार्थ चतुर्वेदी आणि दीपिका पदुकोन त्या गाण्यात रोमांस करताना दिसत आहे. अशातचं रणवीर सिंह (ranveer singh) त्याच्या पत्नीच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. रणवीर सिंह त्याच्या पत्नीला नेहमी सपोर्ट करताना दिसतो. त्याच्या पत्नीला म्हणजे दीपिका पदुकोनला कोणत्याही गोष्टीत मदत करत असताना या आगोदर सुध्दा दिसला आहे, त्यामुळे हे त्याच्या चाहत्यांसाठी नव नाही. त्याने गहराइया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फीवर चढ गया या गाण्यासोबत एक व्हिडीओ तयार केला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियाच्या (social media)माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडियाचं आधार घेत असल्याचं पाहायला मिळतंय.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बनवला व्हिडीओ

रणवीर सिंग आणि दीपीका पदुकोन अनेकदा चर्चेत असतात, त्यांची कारण सुध्दा तशीच असतात. तसेच ते दोघे स्वत:च्या करिअरला घेऊन अधिक सिरीअस असल्याचे समजते. तसेच दोघही एकमेकांना अधिक सपोर्ट करत असल्याचे सुध्दा पाहायला मिळते. आता गहराइया या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्यांनी नवी शक्कल लढवल्याचे पाहायला मिळाले आहे. दोघ एका गाडीतून प्रवास करीत असताना हा व्हिडीओ तयार करण्यात आला असून त्यांनी गहराईया चित्रपटातल्या गाण्यावर गाडीत डान्स केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना अधिक आवडला असून चाहत्यांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत.

दोघांचा गाण्यावर तुफान डान्स

दोघंही एका गाडीतून प्रवास करीत आहेत, त्यावेळी त्यांनी गहराइया चित्रपटातलं गाण गाडीत लावलं आहे. दोघेही आपला व्हिडीओ तयार करीत असताना त्या गाणयावर डान्स करीत असल्याचे दिसत आहे. दोघांनीही व्हिडीओमध्ये तुफान डान्स केल्याचे पाहावयासा मिळत आहे. तो व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला असून अनेक नेटक-यांनी त्यावर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच प्रश्नही विचारले आहेत. अनेकांनी प्रमोशनसाठी काय काय करावं लागतं असं म्हणटलं आहे. अनेकांनी दोघांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतं. उद्या हा चित्रपट तुम्हाला तुमच्या ओटीटी माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तो चित्रपट किती लोकांच्या पसंतीला पडतो. तसेच त्यात दीपीकाने कोणती भूमिका साकारली आहे हेही पाहायला मिळेल.

Jasmin Sandlas Birthday : पंजाबच्या ‘गुलाबी’ गायिकेचा वाढदिवस, जाणून घ्या कोण आहे की ‘गुलाबी’ गायिका…

पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावरती रानू मंडलचा डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल