रोज वेगळी बाई,उद्योगपती नवऱ्याची बिनधास्त पार्टी! बायकोचा आक्षेप नाही, ट्रोलिंग होताच…
नेटफ्लिक्सच्या 'देसी ब्लिंग' शोमुळे प्रसिद्ध झालेले उद्योगपती सतीश संपाल आणि पत्नी तबिंदा यांनी त्यांच्या लग्नावर उठलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले आहे. सतीश वेगवेगळ्या महिलांसोबत पार्टी करतो यावर माझा आक्षेप नाही, या तबिंदाच्या विधानामुळे तिला 'गोल्ड डिगर' म्हणून ट्रोल करण्यात आले. आता दोघांनीही याचा अर्थ चुकीचा लावल्याचे सांगत, एकाच महिलेसोबत पार्टी करण्याबद्दलचा आपला खरा उद्देश स्पष्ट केला आहे.

अब्जाधिश उद्योगपती सतीश संपाल आणि त्याची पत्नी तबिंदा श्(बिंदा)ला नेटफ्लिक्सच्या देसी ब्लिंग या शोने प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. सतीश आणि बिंदा यांच्या लॅविश लाइफस्टाईलची प्रचंड चर्चा होत आहे. दोघांकडेही प्रचंड संपत्ती आहे. या दोघांची संपत्ती पाहून भल्याभल्यांची झोप उडाली होती. एवढेच नव्हे तर शो दरम्यान दोघांच्या मॅरेज लाइफबाबतही प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यावर आता तबिंदा आणि सतीशने उत्तर दिलं आहे.
देसी ब्लिंग शोमध्ये तबिंदाने नवऱ्याच्या कारनाम्यावर भाष्य केलं होतं. सतीश वेगवेगळ्या महिलांसोबत पार्ट्या करत असतो. माझा नवरा रोज वेगवेगळ्या महिलांसोबत पार्ट्या करतो त्यावर आक्षेप नाहीये. पण त्याने एकाच महिलेसोबत रोज पार्टी केली तर माझा आक्षेप असेल.
गोल्ड डिगर…
बिंदाने हे विधान करताच सोशल मीडियावरून तिच्यावर जोरदार टीका होऊ लागली. तिला ट्रोल केलं जाऊ लागलं. केवळ नवऱ्याच्या पैशासाठीच तंबिता नवऱ्याला इतर महिलांसोबत पार्टी करायला देत आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी केली. तसेच तिला गोल्ड डिगर म्हणूनही हिणवण्यास सुरुवात केली.
ट्रोलिंग झाल्यावर तबिंदा आणि सतीश शांत होते. पण आता त्यावर त्यांनी मौन सोडलं आहे. सतीशने समोर येऊन उत्तर दिलं आहे. देसी ब्लिंगमध्ये अनेक गोष्टी होत्या ज्या मी आणि तबिंदाने सांगितल्या. पण लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला, असं सतीश यांनी सांगितलं.
तसं म्हणायचंच नव्हतं…
पार्टीच्या मुद्दयावरही त्यांनी भाष्य केलं. बिंदाने कॅमेऱ्यासमोरच सांगितलं की सतीश पार्ट्यांना जातात. मी वेगवेगळ्या महिलांसोबत पार्टीला जातोय हे ठिक आहे. पण प्रत्येक आठवड्याला तो एकाच महिलेसोबत दिसू नये, असं ती म्हणाली होती. पण तबिंदाच्या या विधानाचा लोकांनी भलताच अर्थ काढला. तिला तसं म्हणायचंच नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.
त्यात चुकीचं काय?
जर तुम्ही कोणत्याही क्लब किंवा रेस्टॉरंटमध्ये गेला तर तिथे मुली असतातच. तिथे मुली नसतील असं होत नाही. जर कोणी हाय, हॅलो करत असेल किंवा मी एखाद्या तरुणीशी बलोत असेल, तिथे लोकांचा घोळका असेल तर त्यात चुकीचं काय आहे? असा सवालही त्यांनी केला.
वाटलं नव्हतं असा अर्थ…
प्रत्येकाला आपल्या मर्यादेची जाणीव असली पाहिजे. पार्टीत जाणं आणि वेगवेगळ्या मुलींसोबत असणं ही चांगली गोष्ट आहे, असं आम्हाला म्हणायचं आहे, असं लोकांना वाटलं. पण आमचा असा मेसेज देण्याचा कोणताच हेतू नव्हता, असंही तंबिदाने स्पष्ट केलं. लोकांनी माझ्या म्हणण्याचा असा अर्थ काढलेला पाहून मी आश्चर्यचकीत झाले. मला पार्ट्यांना जाणं आवडत नाही. माझा नवरा मला पार्टीला जाण्यासाठी जबरदस्तीही करत नाही. त्याने कधीच मला फोर्स केला नाही, असंही तिने सांगितलं.
मग समस्या काय?
सतीशला पार्टी करायला आवडतं. जर एखादा व्यक्ती सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असेल आणि रविवारच्या दिवशी पार्टीला जात असेल तर त्यात समस्या काय आहे? जर त्यांचा एक ग्रुप आहे आणि त्यात मुलीही आहेत, तर त्यात चुकीचं काय आहे? मुली सुद्धा मैत्रीण असू शकतात, असं ती म्हणाली.
मला असं म्हणायचं होतं की, जर कोणी ड्रिंक करत आहे, जर सर्व लोक बसलेले आहेत आणि एक बॉटल शेअर करत आहेत, तर त्याच चुकीचं काही नाही. पण तुम्ही प्रत्येकवेळी एकाच व्यक्तीसोबत पार्टी करता, याचा अर्थ तुमचं अफेयर सुरू आहे. कोणतीही बायको या गोष्टी सहन करणार नाही. मग तुम्ही तिला 40 किलो सोनं द्या किंवा 100 किलो सोनं द्या काही फरक पडत नाही, माझ्या म्हणण्याचा हाच अर्थ होता, असंही तिने स्पष्ट केलं.