AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !

1993 साली आलेला हा कॉमेडी शो त्या काळातला सर्वात मोठा हिट शो ठरला. ही सीरियल हिट होताच संपूर्ण कास्टला अनोख गिफ्ट मिळालं होतं.

33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
33 वर्षांपूर्वी प्रचंड गाजलेला हा शो
| Updated on: Aug 24, 2026 | 9:29 PM
Share

काही टीव्ही शो असे असतात, जे संपल्यानंतरही त्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे कायम राहते. 1993 मध्ये आलेला हा असाच एक गाजलेला कॉमेडी शो. त्या काळात ही सीरिज पाहिली नसेल अशी व्यक्ती विरळाच. या मालिकेने घराघरातल्या प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि दीवान कुटुंबातील गंमती-जमती प्रत्येक घरात पोहोचवल्या. प्रत्येक घरात तो हमखास पहाला जायचाच. त्याची इतकी क्रेझ होती की शो हिट झाल्यानंतर संपूर्ण स्टारकास्टला भेट म्हणून कार देण्यात आल्या. त्यावरूनच या शोच्या लोकप्रियतेचा आणि यशाचा अंदाज लावता येतो. आजही IMDb वरील 8.6 रेटिंग मिळतं, त्यातूनच या गाजलेल्या मालिकेची लोकप्रियता कायम असल्याचं दिसून येतं.

कोणता होता हा सुपरहिट शो?

या सुपरहिट शोचे नाव होते ‘देख भाई देख’. त्याची सुरुवात 1993 मध्ये दूरदर्शनच्या डीडी मेट्रो चॅनेलवर झाली होती. हा एक फॅमिली कॉमेडी शो होता, ज्यामध्ये मुंबईत राहणाऱ्या दीवान कुटुंबातील तीन पिढ्यांची मजेदार कथा दाखवण्यात आली होती. कुटुंबातील रोजचे वाद, मजेशीर प्रसंग, नात्यांमधील गमती-जमती आणि भावनिक क्षण यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

कित्येक मोठ्या कलाकारांनी गाजवला हा शो

या मालिकेत त्या काळातील अनेक प्रसिद्ध कलाकार एकत्र दिसले होते. अभिनेता नवीन निश्चल, शेखर सुमन, देवेन भोजानी, फरीदा जलाल, भावना बलसावर, उर्वशी ढोलकिया, सुषमा सेठ, विशाल सिंह, अमर उपाध्याय, राखी विजान, सतीश शाह, अनन्या खरे, अली खान, लिलीपुट, जतिन कनकिया, अनंत महादेवन आणि करिश्मा आचार्य यांसारख्या कलाकारांचा यात समावेश होता. कलाकारांची दमदार टीम आणि विनोदी कथानक यामुळे ‘देख भाई देख’ हा शो अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

जया बच्चन यांचं खास कनेक्शन

जया बच्चन यांचं या शोशी खास कनेक्शन होतं, कारण आनंद महेंद्रू आणि जया बच्चन यांनी एकत्र मिळून या शोची निर्मिती केली होती. सुरुवातीला ही मालिका डीडी मेट्रोवर प्रसारित झाली. मात्र त्याची लोकप्रियता वाढल्यानंतर या शोचं सोनी टीव्हीवरही प्रसारण करण्यात आलं. अलीकडेच शेखर सुमन यांनी या मालिकेच्या शूटिंगच्या दिवसांतील काही मजेदार आणि आठवणींचे किस्से सांगितले होते. आजच्या तुलनेत तेव्हाच शूटिंग खूप वेगळ होतं. तेव्हा तर सेटवर पंखे किंवा एसीही नसायचे. अनेकदा 10 ते 20 मिनिटांचे लांब शॉट्स घेतले जात आणि त्यासाठी दरवाजे बंद ठेवावे लागायचे, अशी आठवण शेखर सुमन यांनी सांगितली होती. मालिकेच्या लोकप्रियतेचा परिणाम असा झाला की संपूर्ण स्टारकास्टला लाखो रुपयांच्या कार भेट म्हणून मिळाल्या.

Follow Us
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
'2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : '2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'
सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
Rupali Thombre Patil : 'आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही', चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द
Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा