
Priyanka Chopra SSMB29 : एसएस राजामौली यांच्या ‘SSMB29’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा लाँच इव्हेंट 15 नोव्हेंबला होणार आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून हॉटस्टारवरही याचे स्ट्रीमिंग होणार आहे. आतापर्यंत, राजामौली यांनी दोन कलाकारांचे लूक उघड केले आहेत. पृथ्वीराज सुकुमारनपासून सुरुवात करण्यात आली आहे,ज्याचे नाव आहे – KUMBHA . तर त्यानंतर प्रियांका चोप्राचा या चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे, ज्यामध्ये ती पिवळ्या साडीत आणि हातात बंदूक घेऊन दिसत आहे. मंदाकिनी असं तिच्या भूमिकेचं नाव असून या पिक्चरसाठी तिने तब्बल 30 कोटी रुपये फी घेतली आहे. बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणाऱ्या या देसी गर्लची पहिली सॅलरी किती होती हे तुम्हाला माहीत आहे का ?
प्रियांका चोप्राने तिच्या कारकिर्दीची सुरुवात “थमिझन” या तमिळ चित्रपटातून केली, ज्यामध्ये तिची थलापती विजयसोबत भूमिका होती. मात्र 2003 साली आलेलय “द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय” या चित्रपटातून प्रियांकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं , हाच तिचा पहिला हिंदी चित्रपट होता. यामध्ये प्रियांका व्यतिरिक्त सनी देओल आणि प्रीती झिंटा यांनीही काम केलं होते. तर ‘द स्काय इज पिंक’ हा तिचा शेवटचा हिंदी चित्रपट होता, त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये मोठ्या पडद्यावर दिसली नाही.
प्रियांका चोप्राचा पहिला पगार किती होता?
प्रियांका चोप्रा आता पुन्हा भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन आहे. एस.एस राजामौली यांनी ‘SSMB29’ या चित्रपटासाठी तिला आधीच कास्ट केले होते. पण, तिने या चित्रपटासाठी मोठी फी मागितली. रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाने या चित्रपटासाठी 30 कोटी फी आकारली हे. जी इतर कोणत्याही भारतीय अभिनेत्रीपेक्षा खूप जास्त (फी) आहे आणि ती अनेक पुरुष अभिनेत्यांपेक्षा जास्त कमाई करत आहे. या पिक्चरमध्ये तिचा निगेटीव्ह रोल असल्याची चर्चा आहे. या पिक्चरमुळेच ती सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री ठरली आहे. पण पहिला पगार सर्वांसाठीच खास असतो. रिपोर्ट्सनुसार, आत्ता कोट्यवधी कमावणाऱ्या प्रियांका चोप्राची पहिली कमाई, पहिला पगार फक्त 5 हजार रुपये होता. ते पैसे मिळाल्यावर ते तिने तिच्या आईकडे सोपवले.
2000 साली मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर, प्रियांका चोप्राला तिच्या पहिल्या कामासाठी 5000 रुपये मिळाले. आता ती बॉलिवूड चित्रपटांपासून दूर राहिली असी तरी, ती लवकरच एका दक्षिण भारतीय चित्रपटाद्वारे अभिनयात परतणार आहे. राजामौलीचा हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच प्रियांका चोप्रा हॉलिवूडमधील प्रोजेक्ट्समध्येही काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार, तिचे नेटवर्थ हे 650 कोटी रुपये आहे.