आता प्रियांका चोप्रालाही बाळंतपणाचे वेध

हॉ़लीवूड असूदे किंवा बॉलिवूड प्रियांकाने या दोन्ही इंडस्ट्री गाजवल्या. पण, प्रियांकाला आता सेटल व्हायचं आहे. तिला मुलं हवी आहेत, अशी इच्छा तिने स्वत: व्यक्त केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:11 PM, 7 Sep 2019

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच आपली प्रियांका चोप्रा हिला सध्या बाळंतपणाचे वेध लागले आहेत (Priyanka Chopra want to become mother). प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस हे दोघेही कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत राहतात. कधी त्यांच्या लक्झुरिअस लाईफस्टाईलसाठी, तर कधी त्यांच्या हॉट फोटोसेशनसाठी (Priyanka Chopra And Nick Jonas). हॉ़लीवूड असूदे किंवा बॉलिवूड प्रियांकाने या दोन्ही इंडस्ट्री गाजवल्या. पण, प्रियांकाला आता सेटल व्हायचं आहे. तिला मुलं हवी आहेत, अशी इच्छा तिने स्वत: व्यक्त केली.

वोगच्या (Vogue) सप्टेंबर 2019 साठीच्या एका खास मुलाखतीत प्रियांका चोप्राने तिचे भविष्यातील प्लान सांगितले. यावेळी प्रियांकाने तिला आई व्हायचं आहे, असं सांगितलं. तिची इच्छा आहे की तिला मुलं व्हावी, तसेच तिला निक जोनससाठी लॉस एंजलिसमध्ये एक बंगला विकत घ्यायचा आहे, जिथे ती निकसोबत राहू शकेल.

‘मी तिथेच आनंदी राहते, जिथे माझे लोक असतात. तेच माझं घर होऊन जातं. सध्या मला निक आणि माझ्यासाठी एक शानदार घर विकत घेणे आणि मुलं हे माझ्या प्राथमिक यादीत आहेत’, असं प्रियांकाने सांगितलं. ‘मुंबई आणि न्यू यॉर्कमध्ये तर माझं घर आहे, पण सध्या मी निकसाठी लॉस एंजलिसमध्ये एक घर शोधत आहे. जिथे मी त्याच्यासोबत थोडा चांगला वेळ घालवू शकेल’, असंही तिने सांगितलं.

हॉलिवूच्या प्रोजेक्टशिवाय प्रियांका सध्या बॉलिवूड सिनेमा ‘द स्काय इज पिंक’मध्ये (The Sky Is Pink) दिसणार आहे. या सिनेमात प्रियांका सोबत दंगल गर्ल अभिनेत्री जायरा वसीम (Zaira Wasim) आणि अभिनेता फरहान अख्तरही (Farhan Akhtar) दिसणार आहेत. प्रियांका या सिनेमात जायरा वसीमच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या :

आजोबाकडून नातू लाँच, देओल घराण्याची तिसरी पिढी पडद्यावर

तू व्हर्जिनिटी कधी गमावलीस? आगाऊ चाहत्याला एलियाना डिक्रुझचं सडेतोड उत्तर

तुझा धर्म कोणता? गणपतीच्या पुजेनंतर सारा अली खान ट्रोल

मुंबईच्या पावसाने बिग बींच्या घरात पाणी शिरलं, रेणुका शहाणेंचा गुडघाभर पाण्यातून प्रवास