तू व्हर्जिनिटी कधी गमावलीस? आगाऊ चाहत्याला एलियाना डिक्रुझचं सडेतोड उत्तर

'वयाच्या कितव्या तू व्हर्जिनिटी गमावलीस?' असा प्रश्न अभिनेत्री एलियाना डिक्रुझ हिला इन्स्टाग्रामवर एका चाहत्याने विचारला. यावर तुला नाक खुपसण्याची भलतीच सवय आहे. तुझी काय म्हणेल असं बेधडक उत्तर देत एलियानाने त्याची बोलती बंद केली

Ileana Dcruz Virginity, तू व्हर्जिनिटी कधी गमावलीस? आगाऊ चाहत्याला एलियाना डिक्रुझचं सडेतोड उत्तर

मुंबई : सोशल मीडिया हे सेलिब्रिटींना ट्रोल करण्याचं सहज माध्यम झालं आहे. मात्र सेलिब्रिटींनी आपल्या आगाऊ चाहत्यांना सडेतोड उत्तर दिलं, की याच कलाकारांना डोक्यावरही घेतलं जातं. बॉलिवूड अभिनेत्री एलियाना डिक्रुझलाही (Ileana Dcruz) तिच्या एका चाहत्याने अगोचरपणा करत ‘व्हर्जिनिटी’विषयी (virginity) प्रश्न विचारला. मात्र एलियानाने त्याची बोलती बंद करुन टाकली.

एलियानाने नुकतंच इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांनी तिला तिच्या आवडीनिवडी, लाईफस्टाइल, छंद याविषयी काही प्रश्न विचारले. एलियानाने या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. मात्र त्यापैकी एक चाहता भलताच आगाऊ निघाला. एलियानाच्या वैयक्तित आयुष्यात डोकावणारा प्रश्न त्याने विचारला. हा प्रश्न होता ‘वयाच्या कितव्या तू व्हर्जिनिटी गमावलीस?’

एलियानाला हा प्रश्न रुचला नसल्याचं साहजिकच आहे. एखाद्या अभिनेत्रीने त्याकडे दुर्लक्षही केलं असतं. मात्र काही चाहत्यांच्या या वृत्तीला चाप बसावी, म्हणून तिने हा प्रश्न शेअर करण्याचा पर्याय निवडला. ‘वॉव.. दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याची भारी हौस दिसतेय तुला. यावर तुझी आई काय म्हणणार?’ असं उत्तर एलियानाने दिलं.

Ileana Dcruz Virginity, तू व्हर्जिनिटी कधी गमावलीस? आगाऊ चाहत्याला एलियाना डिक्रुझचं सडेतोड उत्तर

ट्रोलिंगला सामोरं जाण्याची एलियानाची ही पहिलीच वेळ नाही. तिला बऱ्याचदा बॉडी-शेमिंगचाही सामना करावा लागला. मात्र प्रत्येक वेळी तिने बेधडक उत्तर देत ट्रोलर्सना गप्प केलं होतं.

एलियानाने ‘बर्फी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असलं, तरी त्याआधी ती कन्नड, तामिळ आणि तेलुगू चित्रपटात गाजली होती. त्यानंतर तिने मै तेरा हिरो, रुस्तम, मुबारकां, बादशाहो, रेड यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. लवकरच ती अनिस बजमीच्या ‘पागलपंती’ या विनोदी चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, क्रिती खरबंदा अशी तगडी स्टारकास्ट आहे.

गेल्या महिन्यात अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यालाही इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी हाच प्रश्न विचारला होता. त्यावर टायगरने ‘अरे निर्लज्जा, माझे आई-बाबा सुद्धा मला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात’ असं उत्तर दिलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *