एक अधुरी कहाणी.. देवोलीनाच्या लग्नानंतर नेटकऱ्यांना आली अभिजीत बिचुकलेची आठवण; पहा VIDEO

गोपी बहूच्या लग्नानंतर नेटकरी का शेअर करतायत अभिजीत बिचुकलेचे व्हिडीओ?

एक अधुरी कहाणी.. देवोलीनाच्या लग्नानंतर नेटकऱ्यांना आली अभिजीत बिचुकलेची आठवण; पहा VIDEO
Devoleena and Abhijeet Bichukale
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 15, 2022 | 3:49 PM

मुंबई: 14 डिसेंबर रोजी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने गुपचूप पद्धतीने लग्न केलं. जिम ट्रेनर शहनवाज शेख याच्याशी तिने लग्नगाठ बांधली. देवोलीना आणि शहनवाज हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना अभिजीत बिचुकलेची आठवण येत आहे.

देवोलीना-बिचुकलेची अधुरी कहाणी

अभिजीत बिचुकले हे बिग बॉस 15 मध्ये वाइल्ड कार्डद्वारे स्पर्धक बनून आले होते. या सिझनमध्ये देवोलीना सिनिअर म्हणून घरात दाखल झाली होती. शोमध्ये या दोघांची चांगली मैत्री झाली होती. मात्र अनेका देवोलीना बिचुकलेवर राग व्यक्त करायची. नंतर काहीही करून बिचुकले तिला शांत करायचा. वीकेंड का वार एपिसोडमध्ये खुद्द सलमान खानसुद्धा या दोघांची मस्करी करायचा.

आता देवोलीनाच्या लग्नाची बातमी समोर येताच नेटकऱ्यांना बिचुकलेची आठवण आळी. सोशल मीडियावर या दोघांचे व्हिडीओसुद्धा शेअर केले जात आहेत. या व्हिडीओमध्ये देवोलीना आणि बिचुकले यांच्यातील मैत्री पहायला मिळतोय. यावर काही भन्नाट प्रतिक्रियासुद्धा येत आहेत.

देवोलीनाच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले, तेव्हापासून ती कोणासोबत लग्न करतेय, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. तिचा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला होता.

कोण आहे देवोलीनाचा पती?

देवोलीनाने जिम ट्रेनर शहनवाज शेखशी लग्न केलं. घराजवळच्या जिममध्येच या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. साथ निभाना साथियाच्या सेटवर जेव्हा देवोलीनाचा अपघात झाला होता, तेव्हा शहनवाजने तिची खूप साथ दिली होती.