
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्षी काही महिन्यांपासून सतत त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 20 मार्च रोजी युजवेंद्र आणि धनश्री यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर दोघांच्या देखील खासगी आयुष्याच्या चर्चा जोरदार रंगू लागल्या. आता धनश्रीने पहिल्यांदाच घटस्फोटावर मौन सोडलं आहे आणि युजवेंद्रला असं उत्तर दिलं आहे की सर्वांनाच अवाक् केलं आहे.
घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर, दोघेही त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाले आहेत. पण नुकताच क्रिकेटपटू युजवेंद्रने एका पॉडकास्टमध्ये घटस्फोटाबद्दल बरंच काही सांगितलं. क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याच्या पॉडकास्ट मुलाखतीनंतर धनश्री वर्माने पहिल्यांदाच सोशल मीडियावरील त्याच्या मौनावर वेगळ्या शैलीत योग्य उत्तर दिलं आहे.
धनश्री हिने इन्स्टाग्रामवर दुबई ट्रिपचे काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये धनश्री स्ट्रीट फूड खाताना दिसली. त्यानंतर ती मंदिरात गेली आणि सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसली. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘बऱ्याच दिवसांनंतर दुबईत परतली आहे.’
‘मी इथेच वाढलr आणि या शहराशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. या ठिकाणाचा बदलता चेहरा पाहून माझं मन आनंदित झालं. यावेळी सर्वात खास क्षण म्हणजे एका सुंदर हिंदू मंदिराला भेट देणं, जिथे मला खूप शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. मी खूप काही शिकली, खूप काही अनुभवले आणि जुने संबंध पुन्हा अनुभवले. माझ्या वाढीबद्दल मी कृतज्ञ आहे.’ सध्या धनश्री हिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत युजवेंद्र याने घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं. घटस्फोटाच्या दिवशी युजवेंद्रने टी-शर्ट घातला होता. ज्यानर Be Your Own Sugar Daddy असं लिहिलं होतं. यावर युजवेंद्र म्हणाला, ‘मला कोणते वाद घालायचे नव्हते. फक्त एक मेसेज द्यायचा होता आणि तो मी दिला. मी कोणाला शिवी दिली नाही आणि कोणासाठी वाईट शब्दांचा वापर केला नाही. पण समोर जे काही पाहिलं त्यामुळे उत्तर द्यावा असं वाटलं, आता मला कोणाचीच काळजी नाही.’ असं युजवेंद्र म्हणाला होता.
चहलच्या विधानावर धनश्रीने थेट कोणतेही उत्तर दिले नाही, परंतु चाहते तिच्या पोस्टला शांत आणि सुंदर प्रतिक्रिया मानत आहेत. धनश्री तिच्या जुन्या शहरात शांतीचा अनुभव घेताना दिसतेय. चाहत्यांचा असा विश्वास आहे की ही पोस्ट पुढे जाण्याचा आणि तिच्या अंतर्गत विकासाचे दर्शन घडवण्याचा एक मार्ग आहे. तेही कोणत्याही वादाशिवाय.