AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्र लिहिलं, कॉफीसाठी बोलवलं आणि…, महिला खासदार, पंकज त्रिपाठी यांच्यामधील ‘ती’ गोष्ट

अभिनेते पंकज त्रिपाठी यांची एक झलक पाहण्यासाठी असंख्य चाहते उत्सुक असतात. अशात त्यांना भेटणं फार कठीण आहे... एका महिला खासदाराने देखील पंकज त्रिपाठी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

पत्र लिहिलं, कॉफीसाठी बोलवलं आणि..., महिला खासदार, पंकज त्रिपाठी यांच्यामधील 'ती' गोष्ट
फाईल फोटो
| Updated on: Aug 05, 2025 | 9:10 AM
Share

अभिनेते पंकज त्रिपाठी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. लोकप्रियता वाढल्यामुळे पंकज त्रिपाठी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील एका महिला खासदाराने केलेल्या वक्तव्यामुळे पंकज त्रिपाठी चर्चेत आले आहेत. महिला खासदाराने पंकज त्रिपाठी यांना कॉफीसाठी बोलवलं… पण दोघांचं भेटणं काही शक्य झालं नाही… यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत महिला खासदार महुआ मोइत्रा यांनी मोठं वक्तव्य केल आहे.

मुलखतीत महुआ मोइत्रा यांनी कबूल केलं की, त्या पंकज त्रिपाठी यांच्या फार मोठ्या चाहत्या आहेत. महुआ मोइत्रा यांनी ‘मिर्झापूर’ पाहिला आणि पंकज तिवारी यांच्या त्या चाहत्या झाल्या. महुआ मोइत्रा यांना अभिनेत्याला भेटायचं देखील आहे. पण अद्याप महुआ मोइत्रा आणि पंकज त्रिपाठी यांची भेट झाली नाही.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सीरिज आणि सिनेमांबद्दल देखील महुआ मोइत्रा यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘मी मुन्नाभाई सीरिज अनेकदा पाहिली आहे आणि सीरिज मला पुन्हा पाहायला नक्की आवडेल… मी विक्की डोनर देखील पाहिला आहे. मला पंकज त्रिपाठी प्रचंड आवडतात. मी त्यांची ‘मिर्झापूर’ सीरिज पूर्ण पाहिली आहे. मी त्यांच्यासाठी एक पत्र देखील लिहिलं होतं. त्या पत्राचं उत्तर अद्याप मला आलेलं नाही.’

महुआ मोइत्रा यांनी पत्रात काय लिहिलं होतं?

पुढे महुआ मोइत्रा म्हणाल्या, ‘मा पत्रात पंकज त्रिपाठी माझे क्रश आहेत असं लिहिले होतं. मला असं वाटतं की, ते सर्वात चांगले अभिनेते आहेत. मला ते मिर्झापूरमध्ये खूप आवडले, अगदी गँग्स ऑफ वासेपूरमध्येही. पत्रात मी म्हणाले होते, मी तुमची खूप मोठी चाहती आहे आणि तुम्हाला कॉफीवर भेटायला मला आवडेल. पण अर्थातच, ते अलिबागमध्ये राहतात आणि कॉफीवर कोणालाही भेटत नाही. पण, मुलाखत घेणाऱ्या अँकरनं मला सांगितलं की, मी पंकज त्रिपाठीची पुढची मुलाखत घेणार आहे, म्हणून मी त्यांना मला एक चिठ्ठी देण्यास सांगितले.’

भेटण्यासाठी उत्सुक…

महुआ मोईत्रा यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी पंकज त्रिपाठी यांना भेटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना अद्याप अभिनेत्याला व्यवस्थित भेटता आलेले नाही. त्या म्हणाल्या, ‘पंकज त्रिपाठी यांना भेटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना भेटता आलं नाही.’ सध्या सर्वत्र महुआ मोईत्रा यांची चर्चा सुरु आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.