AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहलची पूर्व पत्नी जिम ट्रेनरच्या मिठीत? धनश्रीच्या रोमँटिक फोटोची चर्चा, नेमकं काय आहे सत्य?

घटस्फोटाच्या काळात या काळात धनश्रीला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिच्या वैयक्तिक आयुष्यावरून विविध दावे करण्यात आले. मात्र, तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न केला.

चहलची पूर्व पत्नी जिम ट्रेनरच्या मिठीत? धनश्रीच्या रोमँटिक फोटोची चर्चा, नेमकं काय आहे सत्य?
धनश्री वर्माच्या रिलेशनशिपची चर्चाImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2026 | 12:42 PM
Share

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पूर्वाश्रमीची पत्नी आणि प्रसिद्ध डान्सर धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून, एका व्हायरल फोटोमुळे ती नव्या नात्यात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. धनश्रीचं नाव एका जिम ट्रेनरशी जोडलं जात असल्याच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. धनश्री वर्मा ही प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. युझवेंद्र चहलसोबतच्या लग्नामुळे ती क्रिकेट चाहत्यांमध्येही लोकप्रिय झाली. मात्र, दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर आणि मार्च 2025 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सातत्याने चर्चा होत आहे.

घटस्फोटानंतर धनश्रीने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. डान्स, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे ती चर्चेत असते. आता तिच्या नावाशी एका व्यक्तीचं नाव जोडलं जात असल्यामुळे पुन्हा एकदा तिच्या नातेसंबंधांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि चर्चांच्या आधारे धनश्री आणि जिम ट्रेनरच्या नात्याबाबत तर्क लावले जात आहेत. मात्र या फोटोंमागचं सत्य वेगळंच आहे.

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Fuckweiser (@fuckweiser)

फोटोमधील महिला धनश्री नसून कंटेंट क्रिएटर सिमरनजीत बाजवा आहे. या चुकीच्या ओळखीमुळे सोशल मीडियावर नवीन चर्चा सुरू झाली आहे आणि धनश्रीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रेडिटवर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये सिमरनजीत अगदी धनश्रीसारखीच दिसत आहे. एका सेल्फीमध्ये ती एका पुरुषासोबत रोमँटिक पोझ देताना दिसत आहे. सिमरनजीतच्या बाजूला उभा असलेला पुरुष एक जिम ट्रेनर असल्याचं म्हटलं जाचत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना सुरुवात झाली. काहींनी थेट धनश्रीच्या चर्चेत युजवेंद्र चहलचंही नाव ओढायला सुरुवात केली आहे.

धनश्री वर्माने यापूर्वीही ट्रोलिंगबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मार्च 2024 मध्ये कोरिओग्राफर प्रतीक उटेकरसोबतचा तिचा एक आक्षेपार्ह फोटो समोर आल्यानंतर तिला अनेक नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं होतं.

धनश्री आणि युझवेंद्र चहल यांच्या नात्याची सुरुवात सोशल मीडियावरून झाली होती. दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केलं. मात्र, काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाले आणि अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मार्च 2025 मध्ये त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं वृत्त समोर आलं.

Follow Us
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा