
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने नक्कीच बॉलिवूडमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबाने त्यांचे अंतिम संस्कार शांततेत केले. तर आता धर्मेंद्र यांना खऱ्या अर्थाने अंतिम निरोप देण्यात आला. त्यांच्या मृत्यूच्या नऊ दिवसांनी, बुधवारी म्हणजे 3 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या कुटुंबाने त्यांचे अस्थिकलश हरिद्वारला नेण्यात आले होते. धर्मेंद्र यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन करून त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी विधीवेळी धर्मेंद्र यांचे दोन्ही मुले सनी आणि बॉबी उपस्थित होते.
धर्मेंद्र यांच्या अस्थी कुठे विसर्जित करण्यात आल्या
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या अस्थी बुधवारी सकाळी 11 वाजता वैदिक विधीनुसार हरिद्वार येथील गंगेत विसर्जित करण्यात आल्या. कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अंत्यसंस्काराप्रमाणे, हा पवित्र समारंभ अत्यंत गुप्ततेने पार पडला, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनुसार अस्थींचे विसर्जन
सनी देओल आणि बॉबी देओल, त्यांच्या कुटुंबियांसह हरिद्वारला गेले होते. कुटुंबाने शहरातील विधीसाठी एका खाजगी हॉटेलचा घाट निवडला होता. जिथे अस्थींचे विसर्जन करण्यात आले. हा सर्व अंतिम विधी माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी देओल कुटुंबाने विशेष दखल घेतली होती. बुधवारी सकाळी11 वाजताच्या सुमारास कुटुंब हरिद्वारच्या श्रवणनाथ नगर परिसरातील पिलीभीत हाऊस घाटावर पोहोचले आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनुसार अस्थींचे गंगेत विसर्जन करण्यात आले.
माध्यमांना कोणतीही पूर्व माहिती कळू न देण्याची खबरदारी
खरं तर, कुटुंबाला तो एक खाजगी आणि शांतपद्धतीने तो विधी करावा अशी इच्छा होती, म्हणून माध्यमांना कोणतीही पूर्व माहिती कळू न देता हा अंतिम विधी करण्यात आला होता. तसेच घाटाच्या सभोवतालची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
विधीनंतर कुटुंब मुंबईकडे रवाना
विसर्जनानंतर,दओल कुटुंब लगेच मुंबईकडे यायला रवाना झाले आहेत. पण हा सर्व विधी होईपर्यंत समाज माध्यमांना नक्कीच न कळू देण्याची खबरदारी घेण्यात आली होती.