कुटुंबियांकडून घाईत अंत्यसंस्कार, धर्मेंद्र यांचे स्वप्न राहिले अपूर्ण, हेमा मालिनी यांनी केला थेट खुलासा..
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांनी एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. मात्र, धर्मेंद्र यांचे शेवटे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. याबद्दल हेमा मालिनी यांनी खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. मुंबईत त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. धर्मेंद्र यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आणि घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांची तब्येत सतत खालावत होती. सनी देओल आणि बॉबी देओल त्यांच्यासोबत सतत होते. धर्मेंद्र रूग्णालयात होते, त्यावेळी ईशा देओल आणि हेमा मालिनी सतत त्यांना भेटण्यासाठी येत होत्या. अनेक बॉलिवूड कलाकारही धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रूग्णालयात पोहोचले. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र रोजी धर्मेंद्र यांचे निधन झाले. मात्र, धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून सर्व गोष्टी लपवण्यात आल्या. हेच नाही तर धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार कुठे होणार याबद्दलही माहिती कळू दिली नाही. धर्मेंद्र यांची अंत्ययात्राही काढण्यात आली नाही.
धर्मेंद्र यांच्यावर घाईत अत्यंसंस्कार करण्यात आली. आपल्या लाडक्या अभिनेत्याची शेवटी एक साधी झलकही चाहत्यांना बघायला मिळाली नाही. प्रत्येक गोष्टीची गुप्तता धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून पाळण्यात आली. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांना हमद अल रेयामी भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत नेमका काय संवाद झाला हे सांगितले. त्याबद्दलही त्यांनी एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली.
हमद अल रेयामी यांनी मुंबईमध्ये हेमा मालिनी यांची भेट घेतली. रेयामी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत झालेला संवाद लिहिला. हेमा मालिनी रेयामी यांना बोलताना म्हटले की, धर्मेंद्र यांचे कवितांवर खूप जास्त प्रेम होते. मी त्यांना कायमच त्यांच्या लिहिलेल्या कविता प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करत.
मला आठवते की, मी त्यांना विचारायचे कायमच… तुम्ही इतक्या सुंदर कविता लिहिता मग प्रकाशित का करत नाहीत? माझ्या प्रश्नांना त्यांनी हसून उत्तर द्यायचे की, आता नाही… आधी मला काही कविता पूर्ण करू दे… पण वेळेने त्यांना संधी दिली नाही आणि ते निघून गेले… धर्मेंद्र यांच्या जाण्याने हेमा मालिनी यांना अत्यंत मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावरही धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले होते.
