
Dharmendra Death : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या निधनांतर देखील पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी पत्नी हेमा मालिनि यांच्यात अलेला दुरावा समोर येत आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 27 नोव्हेंबर रोजी शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शोक सभेत अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहात धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. पण यावेळी अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा आणि अहाना उपस्थित नव्हत्या.. हेमा यांनी त्यांच्या घरी धर्मेंद्र यांच्यासाठी पूजेचं आयोजन केलं होतं.
सांगायचं झालं तर, 1980 मध्ये अनेक वाद झाल्यानंतर देखील हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं. ज्यामुळे प्रकाश कौर यांना फार मोठा धक्का बसला. तेव्हा प्रकाश कौर पहिल्यांदा आणि शेवटच्या व्यक्त झाल्या होत्या. चार मुलं असताना धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटल्यानंतर प्रकाश कौर यांनी मनातील खंत व्यक्त केली होती.
एका मुलाखतीत प्रकाश कौर म्हणालेल्या, ‘धर्मेंद्र कधीच चांगले पती झाले नाही. पण ते एक उत्तम वडील आहे… धर्मेंद्र त्यांच्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात…’ हेमा मालिनी यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलेलं. ‘हेमाजी प्रचंड सुंदर आहेत, म्हणून कोणताही पुरूष त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतो…’ यानंतर प्रकाश कौर यांनी कायम हेमा मालिनी यांच्यासोबत दुरावा ठेवला…
तर हेमा मालिनी यांनी देखील प्रकाश कौर यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. प्रकाश कौर यांच्यासोबत कधी प्रतिस्पर्धा केली नाही का, ‘जर तुम्ही एखाद्यावर प्रचंड प्रेम करता आणि त्या व्यक्तीकडून देखील तुम्हाला प्रेम मिळत असेल तर, छोट्या – छोट्या गोष्टींची तक्रार का करायची… मी त्यांना (धर्मेंद्र) कधीच त्रास दिला नाही कारण मला सर्वकाही माहिती होतं…’
एवढंच नाही तर, प्रकाश कौर यांच्या कुटुंबातील कोणाचा तिरस्कार वाटतो का? असा प्रश्न देखील हेमा मालिनी यांना विचारण्यात आला, यावर नकार देत हेमा मालिनी म्हणालेल्या, ‘मला कोणाचा तिरस्कार वाटत नाही. त्यामुळे मी आज आनंदी आहे… कोणाला त्रास देण्याचा काय फायदा, ज्यावर तुम्ही प्रचंड प्रेम करता… मी प्रकाश कौर यांच्याबद्दल देखील कधीच काही बोलत नाही, कारण मी त्याचं सन्मान करते…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.