सावत्र आईने ईशा देओल हिच्यासाठी उचलेलं मोठं पाऊल, धर्मेंद्र यांनी केलेला मोठा खुलासा

Dharmendra Death : सावत्र आईला फक्त एकदाच भेटलेली ईशा देओल.... पण त्यांनी सवतीच्या मुलीसाठी उचलेलं मोठं पाऊल... धर्मेंद्र यांनी केलेला मोठा खुलासा

सावत्र आईने ईशा देओल हिच्यासाठी उचलेलं मोठं पाऊल, धर्मेंद्र यांनी केलेला मोठा खुलासा
Actress Esha Deol
| Updated on: Dec 07, 2025 | 11:29 AM

Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगायचं झालंतर, ते त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत तर राहिलेच, पण त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील सर्वत्र रंगल्या… धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देखील अशा काही गोष्टी समोर येत आहेत, ज्या फार कोणाला माहिती देखील नसतील… आता देखील एक गोष्ट समोर आली आहे, ज्यामुळे धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबातील मोठं सत्य समोर आलं आहे… मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी ईशा देओल हिच्यासाठी चांगला नवरा शोधत होत्या…

लेखक राजीव विजयकर यांनी ”धर्मेंद्र: नॉट जस्ट अ ही-मॅन” या पुस्तकाात एक किस्सा लिहिला आहे. प्रकाश कौर त्यांची सावत्र मुलगी ईशा देओव हिच्यासाठी चांगल्या मुलाच्या शोधात होते… सांगायचं झालं तर, 2012 मध्ये ईशा आणि भरत तख्तानी यांच्या लग्नापूर्वी प्रकाश कौर सावत्र मुलीसाठी योग वर शोधत होत्या… ही गोष्ट खुद्द धर्मेंद्र यांनी सांगितली होती…

सांगायचं झालं तर, राजीव यांचा दावा आश्चर्यकारक आहे, कारण ईशा आणि भरत यांच्या लग्नात प्रकाश कौर आणि त्यांच्या कुटुंबातील कोणताच सदस्य हजर राहिला नव्हता… शिवाय अभिनेता सनी देओल यांचा मुलगा करण देओल याच्या लग्नात देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित राहिल्या नव्हत्या… तेव्हा ईशा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

प्रकाश कौर आणि हेमा मालिनी

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये कुटुंबियांच्या आणि समाजाच्या विरोधात जात लग्न केलं. पण लग्नाच्या 45 वर्षांनंतर देखील हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढल्या नाहीत… धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासाठी नवीन घर घेतलं आणि दुसरा संसार थाटला…

प्रकाश कौर यांच्याबद्दल हेमा मालिनी यांनी मोठं वक्तव्य केलं होतं, ‘मी प्रकाश कौर यांच्याबद्दल कधीच काही म्हणालेली नाही… मी त्यांचा प्रचंड आदर करते आणि माझ्या मुली देखील धर्मेंद्र यांच्या कुटुंबाचा आदर करतात…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.