AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra | उपचारासाठी अमेरिकेला गेल्याच्या चर्चांनंतर धर्मेंद्र यांनी पोस्ट केला खास व्हिडीओ; चाहते थक्क!

धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक नसून ते उपचारासाठी अमेरिकेला गेल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांदरम्यान आता खुद्द धर्मेंद्र यांनी ट्विटरवर स्वत:चा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Dharmendra | उपचारासाठी अमेरिकेला गेल्याच्या चर्चांनंतर धर्मेंद्र यांनी पोस्ट केला खास व्हिडीओ; चाहते थक्क!
Dharmendra and Sunny Deol Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 13, 2023 | 1:15 PM
Share

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. मुलगा सनी देओल आणि पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत ते अमेरिकेला उपचारासाठी गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट लिहित त्यांच्यासाठी काळजी व्यक्त केली. यादरम्यान आता धर्मेंद्र यांनी खुद्द ट्विटर म्हणजेच X वर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिलासा दिला आहे. धर्मेंद्र हे काही दिवसांपूर्वीच मुलगा सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत दिसले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेत उपचारासाठी घेऊन गेल्याच वृत्त समोर आलं.

पत्नी प्रकाश कौर आणि मुलगा सनी देओल यांच्यासोबत ते अमेरिकेला गेल्याचं म्हटलं गेलं. आता खुद्द धर्मेंद्र यांनी ट्विटरवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांची प्रकृती ठणठणीत दिसत असून ते पाळीव श्वानासोबत खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत धर्मेंद्र यांनी लिहिलं, ‘मित्रांनो, फार दिवसानंतर मी अमेरिकेत छोट्याशा सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. माझ्या नवीन चित्रपटासाठी मी लवकरच भारतात परतेन. हा प्रेमळ श्वान माझ्या प्रेमात पडलाय.. हाहाहा.’ दुसरीकडे सनी देओलनेही इन्स्टाग्रामवर मित्रांसोबत मजा करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

धर्मेंद्र हे उपचारासाठी अमेरिकेला गेल्याचं मंगळवारी सनी देओलच्या टीमकडून नाकारण्यात आलं. सनी देओल आणि धर्मेंद्र हे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अमेरिकेला गेले आहेत, कोणत्याही उपचारासाठी नाही, असं त्याच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे ते दोघं 16 सप्टेंबरपर्यंत मुंबईत परततील असंही त्यांनी सांगितलं आहे. सोमवारी सनी देओलने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले होते. ‘कॅलिफोर्नियामध्ये विनितचा वाढदिवस साजरा केला’, असं लिहित त्याने सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते.

सनी देओलचा छोटा मुलगा राजवीर देओलसुद्धा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. आगामी ‘दोनो’ या चित्रपटातून तो पुनम ढिल्लनची मुलगी पालोमा ढिल्लनसोबत इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवणार आहे. सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.